(भोर तालुक्यातील रिपब्लिकन पक्ष, भीम आर्मी संघटना,बौद्धजन संघटना,आरपीआय एकतावादी यांच्या वतीने "राष्ट्रीय युवा नेते भैय्या साहेब इंदिसे" यांचा विशेष सत्कार समारंभ खेड शिवापूर येथे संपन्न होताना-------छाया ----विठ्ठल पवार, भोर)
'''''''''''''''"""""""""""'''"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
-------------------------------------------------------------------
कापूरहोळ (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
आपली लोकशाही यशस्वी होण्यासाठी सुजाण व जबाबदार नागरिक तयार करणे ,ही काळाची गरज आहे. लोकशाही व संविधानाचे यश जबाबदार नागरिकांवर अवलंबून आहे,असे मत आर.पी.आय. एकता वादीचे राष्ट्रीय युवानेते भैय्या साहेब इंदिसे यांनी व्यक्त केले.
भोर तालुक्यातील
रिपब्लिकन पक्ष, भीम आर्मी संघटना,बौद्धजन संघटना,आरपीआय एकतावादी यांच्या वतीने "राष्ट्रीय युवा नेते भैय्या साहेब इंदिसे" यांचा विशेष सत्कार समारंभ खेड शिवापूर येथे आयोजित करण्यात आला होता. सध्या देशात व राज्यात होत असलेल्या राजकीय स्थित्यंतरे बाबत बोलत होते. या वेळी
नवनाथ कदम (भोर तालुका अध्यक्ष), किशोर अमोलिक (भोर वेल्हा ,मुळशी रिपब्लिकन सेना अध्यक्ष) ,महेंद्र साळुंखे (भीम आर्मी संघटना, अध्यक्ष),नरेंद्र गायकवाड (उपाध्यक्ष), सागर जगताप (युवा अध्यक्ष आरपीआय एकता वादी),सुनील मोरे (कार्याध्यक्ष),हेमा ताई साळुंखे( महिला अध्यक्ष), प्रवीण गायकवाड (सरचिटणीस आरपीआय एकता वादी),विठ्ठल गायकवाड, रवींद्र कांबळे,सचिन अडसूळ, महेंद्र सपकाळ, निखिल मोरे, अक्षय गायकवाड ,उदय मोरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भीम आर्मीचे नेते ,अध्यक्ष महेंद्र साळुंखे यांनी केले.तर आभार युवक नेते सागर जगताप यांनी मानले.
-------------------------------------------------------------------
