करंदी खे. बा.शाळेला स्नेहसंमेलनातून 70 हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव.

Maharashtra varta

(करंदी खे. बा. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील स्नेहसंमेलनात  सहभागी विद्यार्थी).
"""""""""""""""""""""""""'""""""""""""""""""
---------------------------------------------


कापूरहोळ ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

 भोर तालुक्यातील करंदी खे. बा. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत "माझी शाळा, माझा प्रत्येक विद्यार्थी" ही आपुलकीची भावना निर्माण करत  तीन  तासात  70 हजार रुपयांची रोख  मदत करुन ग्रामस्थांचा ,पालकांचा पर्यायाने करंदी गावचा शाळेसाठी सहभाग खूप मोठा व आदर्श प्रेरक आहे,असे प्रतिपादन करंदीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. महादेव गायकवाड यांनी केले.

   अखंड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता समारंभाचे प्रयोजन साधत शाळेने विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलांना ग्रामस्थांनी दाद दिली. 

प्रथम शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी हिंदी-मराठी गाण्यांवर सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच यावेळी सर्व ग्रामस्थांनी स्वतःची  मुले जिल्हा परिषद शाळेतच दाखल करणार याचा निर्धार केला. यावेळेस मुलांनी भारतीय संस्कृतीचे व सामाजिक प्रबोधनाचे अनोखे दर्शन विविध गाण्यांच्या माध्यमातून घडवले. तसेच यावेळी "मायबोली महाराष्ट्राची" यावर आधारित विविध गीते झाली


काही ग्रामस्थांनी   शाळेत शैक्षणिक आधुनिक तंत्रज्ञान साधन रूपाची भेट तसेच काहीजणांनी पैशाच्या रूपाने शाळेस मदत करण्याचा प्रयत्न केला.एकूण 70 हजार रुपयांची शैक्षणिक मदत निधी शाळेस स्नेहसंमेलनातून मिळाला.  


या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुजाता तळेकर व तानाजी नाईलकर यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न अंगणवाडी सेविका उषाताई खाटपे व  शाळेतील शिक्षक पंकज राठोड व श्याम हेडगिरे सर  यांनी केले.

 या स्नेहसंमेलन कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी,महिला व युवक तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(स्नेहसंमेलन पाहून ग्रामस्थांचा निर्धार:---
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी हिंदी-मराठी गाण्यांवर सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.  यावेळी सर्व ग्रामस्थांनी स्वतःची  मुले जिल्हा परिषद शाळेतच दाखल करणार याचा निर्धार केला. )
-----------------------------------------------------
(करंदी खे. बा. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील स्नेहसंमेलनात  सहभागी विद्यार्थी.)
-----------------/-//-/-------------------------------//---------
To Top