(काल्याचे किर्तन रुपी सेवा देताना अनाथांची माय व बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. नवनाथ महाराज लिमण )
-----------------------------------------------
कापूरहोळ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
सध्या धावपळीच्या युगात माणसांच्या जीवनात जर सुख समाधान शांती ,आनंद प्राप्त करून जीवन सफल व उन्नत होण्यासाठी प्रत्येकाला एक तरी आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीची संत संगत असणे ही काळाची गरज बनली असल्याचे मत अनाथांची माय आणि बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प .नवनाथ महाराज लिमण यांनी व्यक्त केले .
करंदी खेडे बारे ता. भोर, जि. पुणे येथे समस्त करंदी खेडेबारे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा मध्ये रविवार दिनांक 2 पासून प्रारंभ झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता रविवार दि. 9 रोजी झाली. यंदाचे हे 34 वे वर्ष होते.काल्याचे किर्तन रुपी सेवा देताना ह. भ. प. नवनाथ महाराज लिमण बोलत होते. रविवार दिनांक 9 रोजी दुपारी बारा वाजता दही हंडी फोडून मोठ्या भक्तिमय वातावरणात काला पार पडला,ग्रामप्रदक्षिणा संपन्न झाली .त्यानंतर श्री विठ्ठल-रखुमाईची महाआरती झाली. बनेश्वर वारकरी शिक्षण संस्था माळेगाव,देवडी,देगाव, नायगाव, कामथडी, नसरापूर, किकवी, केंजळ, राजापूर, उंबरे ,कांबरे खे .बा.खडकी सांगवी, पारवडी,मिसाळ वाडी, साळवडे, पांडे,जांभळी,हातवे, मोहरी, दिवळे, कापूरहोळ सारोळा अन्य भागातील महिला व पुरुष भाविक तसेच ग्रामस्थ ,वारकरी काल्याच्या किर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्त ग्रामस्थ करंदी खे .बा. यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते.
