पुस्तकी ज्ञानाला, अनुभवाची जोड ,मैदानावर शिकविले घड्याळ व कालमापन

Maharashtra varta


(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,बालवडी येथील शिक्षकांनी वर्गातील अध्यापनाला अनुभवाची जोड देऊन प्रत्यक्ष कृतीतून मैदानावर घड्याळाची प्रतिकृती तयार करुन विद्यार्थ्यांना वर्तुळ आणि घड्याळ वाचन याचा अनुभव दिला.)
--------------------------------------------------------------
----------------------------------------------------------
कापूरहोळ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालवडी येथील शिक्षकांनी वर्गातील अध्यापनाला अनुभवाची जोड देऊन प्रत्यक्ष कृतीतून मैदानावर घड्याळाची प्रतिकृती तयार करुन विद्यार्थ्यांना वर्तुळ आणि घड्याळ वाचन याचा अनुभव दिला.

मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांचे संकल्पनेतून सहकारी शिक्षक महादेव बदक, आनंदा सावले, अंजना घोलप यांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर मैदानावर घड्याळाची प्रतिकृती तयार करुन वर्तुळ,त्रिज्या,जीवा,व्यास,वर्तुळाचा केंद्रबिंदू, अंतर्भाग, बाह्यभाग,वर्तुळावरील बिंदू,अंतर्भागातील बिंदू,बाह्यभागातील बिंदू,वर्तुळाचा परीघ,वर्तुळ कंस इत्यादी वर्तुळाबद्दलची महिती दिली.

तसेच कालमापन अंतर्गत घड्याळ वाचन याबद्दल माहिती देऊन सेकंद काटा,मिनिट काटा,तास काटा,१२ व २४ तास यांची माहिती देऊन मुलांना घड्याळ वाचन शिकवले.
------------------------------------------------------------------
To Top