वैद्यकीय अधीक्षकांच्याविरुद्ध भोरमध्ये एल्गार

Maharashtra varta
(फोटो -  भोर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांच्या निषेधार्थ भोर राजवाडा चौकात मोर्चा काढण्यात आला)
""""""'"''''''''''''''''"''''''''''"""""""""""""""""""""""""""""
पुणे (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष असलेले भोरचे गटविकास अधिकारी यांना उपजिल्हा रुग्णलयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी अपशब्द भाषा वापरून अवमान केल्याप्रकरणी सर्व शासकीय कर्मचारी आणि विविध घटकांनी एल्गार करत मोर्चा काढून वादग्रस्त वैद्यकीय अधिक्षकांचा तातडीने निलंबन करण्याची मागणी करत निषेध करण्यात आला असून प्रांतधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

कागदपत्रे मागितल्याच्या कारणावरून भोर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांनी रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांना अपशब्द भाषा वापरून अपमानित केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने सर्व शासकीय कर्मचारी संघटना यांनी एकत्र येत मंगळवारी भोर येथे राजवाडा चौकात मोर्चा काढून डॉ. बामणे यांचा जोरदार निषेध करण्यात आला. 

यावेळी सभापती श्रीधर किंद्रे,उपसभापती दमयंती जाधव, माजी उपसभापती लहुनाना शेलार, कॉग्रेसचे दिलीप बाठे, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा रेखा टापरे, छाया बांदल, अलका तळेकर, प्रहार संघटनेचे बापू कुडले, तालुका शिक्षक संघटनचे सुदाम ओंबळे, समीर घोडेकर, तसेच ग्रामसेवक, पंचायत समिती लिपिक,विस्तार अधिकारी, दिव्यांग कर्मचारी, प्रहार संघटना, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कर्मचारी, आशा कर्मचारी संघटना यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता.

दरम्यान, रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी शुक्रवारी दि. ७ रोजी झालेल्या मासिक मिटिंगमध्ये मागील अहवाल आणि इतर कागदपत्रे पाहणीसाठी मागणी केली होती. या शुल्लक कारणावरून भर मिटिंगमध्ये भोर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा समितीचे सचिव डॉ. दत्तात्रय बामणे यांनी तनपुरे यांना अपशब्द भाषा वापरून अपमानित केले होते. यावेळी वादळी वातावरण निर्माण झाल्याने बैठक गुंडाळली होती. यानंतर भोर पोलीस ठाण्यात परस्पर एकमेकांनी तक्रार दिली होती.   

वादग्रस्त अधीक्षकांना गेट आउट करा.....
वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांचा मनमानी कारभारामुळे उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या  रुग्णाची सातत्याने हेळसांड होत असल्याने त्यांचा कार्यकाळ नेहमी वादग्रस्त राहिला आहे. याबाबत वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सुद्धा त्यांनी धमकी दिली होती. सर्वच घटकातील नागरिकांना हीन वागणूक देणाऱ्या डॉ. बामणे यांचे तातडीने निलंबन करून त्यांना गेट आऊट करण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.

---- --- --- ------------------------------/-/---------////------
To Top