""''''"'''""""""""""""""""""""""''"''''''''''''''''''''''""''"''''''
कापूरहोळ (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर, वेल्हा, हवेली व पुरंदरच्या सर्वपक्षीय सदस्यांनी टोल नाका हटाव आंदोलनात उतरण्याचा पूर्णपणे निश्चय केला असुन हे आंदोलन NHAI व जिल्हा प्रशासनाला टोलनाका हटवण्याबाबत बाबत निर्णय घ्यायला भाग पाडेल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती टोल नाका हटाव कृती समितीचे सदस्य डॉ. संजय जगताप यांनी महाराष्ट्र वार्ताशी बोलताना दिली.
जगताप पुढे माहिती देताना म्हणाले की,
शिवगंगा खोऱ्यातून शिवसेनेचे जेष्ठ नेते सोमनाथ आबा लांडगे यांनी मोर्चे बांधनी सुरू केली असुन त्यांच्या सोबत तब्बल 2000 नागरिक या आंदोलनात उतरतील असा विश्वास त्यांनी दिला आहे.
तसेच भोर तालुक्यातून पुणे जिल्हा शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची देखील मोर्चे बांधणी सुरू झाली असुन "भोर वेल्ह्यातील भुमीपुत्रांसाठी राजकीय जोडे बाजुला ठेऊन हा कुलदिप तात्या आंदोलनात सर्वात पुढे असेल". अशी आक्रमक भुमिका समिती कडे व्यक्त केली आहे.यामुळे सर्व भुमिपुत्र या आंदोलनात एकवटल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.
डॉ .संजय जगताप पुढे म्हणाले की,
कलम 144 हे जमावबंदी बाबत असुन ते बहूतेक शहरात लागूच असते.सबब समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना आंदोलनाची व्याप्ती पहातापोलिसांनी नोटीस देणे अपेक्षितच होते. मात्र त्यात 16 तारखे पर्यंत हद्दपार का करू नये याची विचारणा करणे हे नक्कीच आक्षेपार्ह आहे. असे मत जगताप यांनी व्यक्त केले.
पोलीस प्रशासनाला आज कृती समिती कडून मेल केला जाणार आहे,हे सांगण्यात आले तर (दि. 14) फेब्रुवारीला जिल्हाधिकारी पुणे यांच्याबरोबर तातडीची बैठक बोलावू शकतात.समितीने चर्चेचे दरवाजे बंद केले असले तरी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासना सोबत जरूर ती चर्चा करून जनतेला न्याय मिळवून द्यावा .मात्र आता टोलनाका हटलाच पाहिजे.अशी भूमिका
शिवापुर टोल नाका हटाव कृती समिती घेऊन जलद वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे.
------------------------------------------------------------------
