"करंदी खे. बा". येथे क्रिकेटचे सामने उत्साहात संपन्न....,

Maharashtra varta
(क्रिकेट स्पर्धेमध्ये वाघजाई क्रिकेट क्लब वागजवाडी ता. भोर यांना 11 हजार रुपयाचे बक्षीस व सन्मानचिन्ह तर  देऊन त्यांचा गौरव केला, )
__________________________________________
कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

आजच्या आधुनिक युगात तरुण-तरुणी  मैदानी खेळ विसरत चालले आहे . खेळापासून दूर जाणारी तरुण  पिढी मोबाईलच्या आहारी गेली असून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहेत.खेळ व खेळाचे महत्त्व पुन्हा पटवून देण्यासाठी ग्रामस्थ, सामाजिक प्रतिष्ठानने,संस्थांनी प्रयत्न करून क्रीडा स्पर्धा आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे मत भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन अप्पा कोंडे यांनी केले.


करंदी खे. बा. ता. भोर येथे समस्थ ग्रामस्थ मंडळ, करंदी खे. बा. ता. भोर यांनी "शिवजयंती'' निमित्त आयोजित 'क्रिकेट चे सामने दिनांक 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले होते. त्या क्रिकेट च्या सामन्यांचे बक्षीस वितरण' समारंभ, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्या कार्यक्रमात कोंडे बोलत होते. 



 या कार्यक्रमास भोर पंचायत समितीचे मा. उपसभापती अमोल पांगारे, भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे, मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंदु भैय्या परदेशी, जय शिवराय पतसंस्थेचे संस्थापक सदस्य महेश दादा मरळ, शिवसेनेचे युवा नेते नितीन दादा इंगुळकर,उद्योजक विशालभाऊ शिंदे,मनोज बोरगे, राहुल पांगारे, संदीप गोडसे, मनोज कोंडे,तानाजी खाटपे,हरी आबा खाटपे व करंदी  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पळशी ता. खंडाळा येथील क्रिकेट संघास पंधरा हजार रुपयाचे बक्षीस व सन्मानचिन्ह ,तर द्वितीय  क्रमांक वाघजाई क्रिकेट क्लब वागजवाडी ता. भोर यांना 11 हजार रुपयाचे बक्षीस व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक जानुबाई प्रतिष्ठान, कामथडी येथील क्रिकेट संघास सात हजार रुपये बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला, तर शिस्तबद्द संघ म्हणून करंदी खे. बा. येथील क्रिकेट संघास सन्मानित करण्यात आले.
 तरी या क्रिकेट स्पर्धेमध्ये सलग तीन षटकार सुरज भरगुडे पळशी, सलग तीन चौकार अक्षय सोनवणे(शिवतेज क्रिकेट क्लब), सलग तीन विकेट अनिकेत खाटपे,  सर्वोत्कृष्ट गोलंदाज समीर आवाळे, सर्वोत्कृष्ट फलंदाज सुरज माताळे,(कामथडी), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिल गायकवाड.व मॅन ऑफ दी सिरीज जीवन बोरगे (करंदी) यांना हे वैयक्तिक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 उपस्थितांचे स्वागत भोर तालुका नारी समता मंचाचे अध्यक्ष विजयराव कव्हे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

   
आदित्य बोरगे(उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवा सेना) यांच्या संयोजन रुपी विचाराने,सत्यवान बोरगे ,नवनाथ गायकवाड, अनिल गायकवाड, तानाजी साबळे, अनिकेत खाटपे, जीवन बोरगे, विशाल बोरगे, अक्षय खाटपे, अक्षय सोनवणे, आदींनी या क्रिकेट स्पर्धेचे संयोजन व आयोजन उत्कृष्टरित्या केले.
----------------------------------------------------------------__
To Top