(पालाणा ता.वाई जि.सातारा येथील स्ट्रॅाबेरी शेतीची पाहणी करताना बालवडी येथील शिक्षक व विद्यार्थी)
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
-----------------------------------------------
कापूरहोळ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
बालवडी ता. भोर येथील आदर्श व उपक्रमशील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची परिसर सहल मुख्याध्यापक भिमराव शिंदे, सहकारी शिक्षक महादेव बदक यांचे मार्गदर्शनाखाली बालवडी जवळच्या डोंगरावर असणाऱ्या पालाणा ता.वाई जि.सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
पालाणा ही दहा-पंधरा घरांची लहान वस्ती असून त्याठिकाणी डोंगरावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्ट्रॅाबेरी शेती केली जाते.त्या स्ट्रॅाबेरी शेतीची पाहणी करुन त्यासाठीचे हवामान, खत,पाणी,मशागत,मातीचा प्रकार,बाजारपेठ तसेच त्याठिकाणचे लोकजीवन तेथील लोकांचे,अन्न,पाणी,आरोग्य,शिक्षण,व्यवसाय,पर्जन्यमान,दैनंदिन गरजा आणि त्यांची पूर्ततेबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन प्रत्यक्ष अनुभव निरीक्षण केले.
पालाणा येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षक यांचेशी संवाद साधून शाळेविषयी माहिती घेतली. मुख्याध्यापक दिगंबर नरवडे सहकारी शिक्षक नामदेव हिरवे यांनी पालाणा गावचा इतिहास सांगून शिक्षकांचा यथोचित सन्मान करुन विद्यार्थ्यांना खाऊ दिला.
न्यु इंग्लिश स्कूल, मांढरदेव या शाळेला भेट देऊन भविष्यातील धावपटू घडावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या शाळेतील राज्य आणि देशपातळीवर धावण्यामध्ये नंबर मिळविलेल्या अनेक यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथा मार्गदर्शक आदर्श शिक्षक राजगुरु कोचळे सर यांचेकडून जाणून घेऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
-------------------------------------------------------------------
