("किल्ले राजगडावर" स्वच्छता अभियानात कचरा गोळा करताना तरुण)
---------------'''''''''''''"""""""""'''''-------------''':::::::::::'''"""':;;;;-
कापूरहोळ:(प्रतिनिधी)
महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात अधिक काळ वास्तव्य केलेल्या व हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर स्थानिक तरुणांनी स्वच्छता अभियान राबवले.
"स्थानिक मावळा जवान संघटनेच्या" पुढाकाराने
'शिवप्रबोधन सप्ताहा' निमित्ताने राजगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात गडाच्या बालेकिल्यावरील, तसेच राजसदरेसमोरील प्लॅस्टिक व इतर वस्त़ुचा पडलेला कचरा गोळा करण्यात आला. 25 - 30 पिशव्या कचरा जमा करून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आला.
या अभियानात संघटनेचे रोहित नलावडे,कार्याध्यक्ष अविनाश रांजणे, योगेश खोपडे, सागर नलावडे, अक्षय नलावडे, ओंकार नलावडे, सुरज नलावडे, केतन नलावडे, निवृत्ती चव्हाण, चेतन नलावडे, अक्षय नलावडे, अभिषेक नलावडे, अनिकेत नलावडे, अनुज चव्हाण,शंकर पवार आदि तरुण सहभागी झाले होते .
रोहित नलावडे म्हणाले , राजगडावर अलिकडच्या काळात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. पर्यटकांना स्वंय शिस्त लागावी . प्लॅस्टिकच्या बाटल्या ,कचरा टाकू नये यासाठी आवाहन केले जात आहे.
-------------------------------------------------------------------
