हातवे ता. भोर येथे प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली सदिच्छा भेट ........

Maharashtra varta
(हातवे ता. भोर येथे प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी  सदिच्छा भेट देऊन त्यांचे असणारे मित्र व चाहते यांच्याशी दिल खुलास संवाद साधताना)
""""'''"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
कापूरहोळ (प्रतिनिधी ):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

"आयुष्य जगत असताना आपण सुखी समाधानी आनंद असावे असे प्रत्येकालाच वाटत असते, मात्र त्यासाठी समाजात व परिवारात वावरताना प्रत्येक  व्यक्तीने  प्रामाणिक , नैतिकता ,चारित्र्यता आणि व्यावहारिक पणा जोपासावा. तरच तुमचे आयुष्य समृद्ध होईल" असे विचार प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

हातवे ता. भोर येथे प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी  सदिच्छा भेट दिली.त्यांचे असणारे मित्र व चाहते यांच्याशी दिल खुलास संवाद साधत एक मैत्रीचा, एक माणूसकीचा  विचार मांडत आयुष्यात एक  चांगले मित्र प्रत्येकालाच मिळावेत,चांगली मैत्री असणे म्हणजे चांगले विचार आहेत अशी भावना यानिमित्ताने मांडत आपल्या मित्र सदस्यांशी अनौपचारिक  गप्पा मारल्या.व तेथील शेतावर भेट देऊन मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला.

याप्रसंगी वेळूचे उद्योजक जीवन नाना धनावडे ,चिदानंद डेव्हलपर्सचे अमोलशेठ पांगारे ,आदर्श मा.सरपंच ज्ञानेश्वर माऊली पांगारे ,उद्योजक मंगेशजी सुर्वे व हिरामण पांगारे,सोमनाथ सोमाणी  व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.

(महाराष्ट्र वार्ताशी बोलताना युवा उद्योजक अमोलशेठ पांगारे म्हणाले की,.जीवननाना धनावडे मी..आणि आमचा  जिवलग मिञ परीवार कायमच आम्ही एकत्र असतो.
चंदेरी पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवुनं ठेवणारा..!नाम फाऊंडेशन च्यां माध्यमातून सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवणारा..!दिलदार माणुसं..!एक मनस्वी कलावंत...!अभिनेता...."नाना पाटेकर" आमच्या हातवे येथील शेतावर आले..!त्याच्या सोबतचे स्नेहभोजन व गप्पांची मैफिल रंगली..!खुप दिवसापासुनं एक प्रश्न मनात होताचं..!तो म्हणजे "नाना" हे नाव खरं आहे का..?टोपननाव...? आणि उत्तर मिळालं १००% खरं...! या भेटीचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय होता...!)
-------------------------------------------------------------------
To Top