खेडशिवापुर टोलनाका बंद व्हावा यासाठी संभाजी ब्रिगेड यांचे बेमुदत उपोषण आजपासून सुरू....

Maharashtra varta
(खेडशिवापुर टोलनाका बंद व्हावा यासाठी संभाजी ब्रिगेड यांचे बेमुदत उपोषण आजपासून सुरू.... )
:::::::::::::::::::::::::::::""""""""""""""""""""":::::::::::::""""""""""
पुणे( प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर टोल नाक्यावर भोर ,वेल्हा पुरंदर व इतर भागातून हजारो प्रवास करणार्‍या नागरिकांना भयानक वाहतूक कोंडीत जीव मुठीत धरुन त्रास सहन करावा लागत आहे. सदर टोलनाक्‍यावर प्रवास करणाऱ्या लोकांना दररोज दोन ते तीन तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. दररोज आर्थिक लूट होत आहे. टोल प्रशासन येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाहीत. उलट वाहतुकीला अडथळा येण्यासाठी टोल व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार दिसत आहे. फास्ट टॅग ही अत्यंत फालतू यंत्रणा असून उद्योगपतींची घरे भरणारा धंदा आहे. यामुळे खेड शिवापूर टोल नाका बंद करावा, अन्यथा पुणे जिल्ह्याच्या बाहेर तात्काळ हटवा अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे  जिल्हाधिकारी पुणे  यांच्याकडे  केली आहे.

संभाजी ब्रिगेड यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की,
 दिनांक 31 जानेवारी 2020 पर्यंत खेड शिवापूर टोल नाका तात्काळ बंद करावा अथवा पुणे जिल्ह्याच्या बाहेर तात्काळ हटवावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड तालुक्याच्या वतीने आजपासून सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2020 पासून स्थळ खेड शिवापूर टोल नाका पुणे सातारा रोड शिवापूर येथे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. असे दिनांक 21/ 1 /2020 रोजी आपल्या कार्यालयात देण्यात आले आले होते.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने खेड शिवापूर टोल नाका या ठिकाणी होणारी बेमुदत उपोषण कायदा व सुव्यवस्थेचा आदर करून सर्वसामान्य जनतेला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बेमुदत उपोषण हे  जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2020  पासून जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे सकाळी करण्यात येत आहे .अशी माहिती संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. 

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड भोर तालुका अध्यक्ष  गणेश चरहाटे, भोर विधानसभा अध्यक्ष पंढरीनाथ सोंडकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील,विजय निगडे,दत्तात्रय खुटवड,सुरेश महाराज तनपुरे, प्रदीप खुटवड,रोहित चव्हाण, तानाजी मालुसरे,राम मालुसरे आदी उपस्थित होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
To Top