"पंढरीनाथ सोपानराव यादव यांचे निधन"......

Maharashtra varta
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कापूरहोळ:(प्रतिनिधी)----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

"बोट सुटले हातून तरी
सावली अजून माथ्यावरी.
वात्सल्याचा राहो सदा 
आशिर्वाद आम्हावरी.
घेऊनी सामाजिक मानवी मूल्यांचा वसा..
समाजात उमटवला वेगळाच ठसा.
लोकसेवेची आवड भारी
स्नेह फुलविला दारोदारी"....

असे आदर्श जीवन जगून यादव  कुंटुबाला आणि समाजाला नवी दिशा व प्रेरणा देणारे कोंढणपूर ता. हवेली येथील जुन्या पिढीतील विचारवंत पंढरीनाथ सोपानराव यादव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श व मनमिळाऊ नेत्रदीपक होत.एका चांगल्या व्यक्तीला आपण मुकलो आहोत.अश्या आदर्श माणसाला अर्थात पंढरीनाथ भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐💐💐💐💐

कोंढणपूर येथील सामाजिक, आध्यात्मिक कार्यकर्ते 
पंढरीनाथ सोपानराव यादव(वय 90) यांचे  नुकतेच अल्पशा आजाराने निधन  झाले. कोंढणपूर गावच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार वेळेस पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच भोर,हवेली वेल्हे तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या मागे 2 मुले  1 विवाहित मुलगी ,सुना ,नातवंडे  असा परिवार आहे. 
पुणे महानगरपालिकेचे शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रशासकीय अधिकारी शरद यादव यांचे ते वडील होत. 
-------------------------------------------------------------------
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३.
-----------------------------------------------------------------

To Top