(पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडून पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस शिपाई अमोल शेडगे प्रशंसापत्र देऊन उचित सन्मान .छाया --विठ्ठल पवार. )
----------------------------------------------------------
कापूरहोळ(प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडून पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस शिपाई अमोल शेडगे प्रशंसापत्र देऊन उचित सन्मान करण्यात आला.
पोलीस शिपाई अमोल शेडगे यांनी गेली 9 वर्ष पोलीस प्रशासनात उत्कृष्ट काम करत, भोर विभागात व पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणचे मोक्यातील व दरोड्यातील ,खून व खुनाचे प्रयत्नांतील आणि खंडणीतील आरोप्याना शिताफीने जेरबंद केले आहे.विविध गुन्हे व त्यांची माहिती, त्यांची उकल काढून विशेष मदत केली आहे.भोर विभागातून उत्कृष्टपणे गुन्हे प्रकटीकरणाचे कामकाज केले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2020 रोजी पुणे येथे प्रशंसापत्र देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
पोलीस शिपाई अमोल शेडगे यांनी पोलीस प्रशासनात पुणे पोलीस मुख्यालय, भोर पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट काम केले आहे.सध्या 6 महिन्यापासून पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.या शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना दिलीप जाधवर बाळासो खडके, पी .एस. आय.अमोल गोरे, राजेंद्र चंदनशिव यांचे सहकार्य त्यांना लाभत आहे.
शेडगे यांच्या जन्मगावी विंझर ता. वेल्हा येथे समस्त वेल्हेकर यांच्या वतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी,पदाधिकारी ,कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
-------------------------------------------------------------------
