जोगवडी आरोग्य केंद्रात आरोग्याच्या विकेंद्रित नियोजनाची कार्यशाळा संपन्न.श्रीपाद कोंडे.

Maharashtra varta
-----/------------------------;;-----------------------------------
भोर( प्रतिनिधी):- विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

गावच्या विकासात नागरिकांचे आरोग्य अतिशय महत्वपूर्ण असून यावर आधारित गावचा विकास अवलंबून असतो, स्वच्छता तेथे लक्ष्मी,हा संदेश घराघरात गावागावात पोहचवणे,जनजागृती करणे या महत्वपूर्ण बाबी  असून या सामाजिक कार्यात गावच्या विकास यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा देखरेख समितीचे  सदस्य व रचना संस्थेचे समन्वयक श्रीपाद कोंडे यांनी केले. 

जोगवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या विकेंद्रित नियोजनाची कार्यशाळा नुकतीच पार पडली.जिल्हा देखरेख समिती सदस्य व रचना संस्थेचे समन्वयक श्रीपाद कोंडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 

उपकेंद्र निहाय गटचर्चा घेऊन गावात असणाऱ्या आरोग्य गरजा उपस्थितांकडून सादरीकरणाद्वारे सर्वांसमोर आणल्या.या कार्यशाळेत आळंदे गावचे उपसरपंच राहुलदादा कांबळे,जोगवडीच्या सरपंच मिना सावंत, पोलीस पाटील उर्मिला धुमाळ, वैद्यकीय अधिकारी माधुरी शिरसाट आणि आरोग्य सहायक कैलास भोसले यांनी चर्चेतून पुढील मुद्दे मांडले.  प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात मधुमेह रुग्णांसाठी आवश्यक औषधे ,अंगणवाडीतील मुलांसाठी दूध, खजूर,आणि अंडी असा आणि पुरेसा पौष्टिक आहार, वृद्ध रुग्णांसाठी दवाखान्यात संवाद कक्ष व येण्यासाठी वाहतूक व्यवस्था गावात डास, मच्छर निर्मूलनाची कायमस्वरूपी व्यवस्था , पाणी तपासणीचा अहवाल ग्रामपंचायत व नागरिकांना त्वरित मिळण्यासाठी व्यवस्था, अंगणवाडी साठी मुलांच्या औषधं, टॉनिक यांचा नियमित पुरवठा करणे , 15 ते 50 वयोगटाच्या महिलांना लोह तपासणी करणे व त्या विषयी समुपदेशन असे महत्वाचे आरोग्य प्रश्न चर्चेत आले. या वेळी  आशा कार्यकर्त्यां, अंगणवाडी सेविका, नर्स, आरोग्यसेवक आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेनंतर प्रायोगिक तत्वावर आळंदे व    ब्राह्मणघर या दोन निवडलेल्या गावांत आरोग्य ग्रामसभा घेऊन प्रामुख्याने मुलं,किशोरी मुली, महिला व वृद्ध यांच्या आरोग्य गरजांवर नियोजन केले जाईल असे आळंदे उपसरपंच राहुलदादा कांबळे यांनी सांगितले.प्रास्तविक  कृष्णात जगताप यांनी करून सुत्रसंचालन  योगेश बांदल आणि आभार किरण भाऊ धुमाळ यांनी मानले.
-------------------------------------------------------------------
To Top