"खोपीच्या उपसरपंचपदी सतीश मोरे यांची निवड"

Maharashtra varta





(खोपी गावच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने "उपसरपंच सतीश मोरे" यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा देताना मान्यवर)
---------------------------------------------------------------

भोर :-प्रतिनिधी
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

खोपी ग्रामपंचायत उपसरपंच पदी  सतीश बबन मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी  म्हणून  ग्रामसेवक कालिदास  शेलार यांनी काम  पाहिले.

खोपी गावच्या सरपंच पुष्पाताई मारणे,
 ग्रामपंचायत सदस्य गंगूबाई कचरे , अश्विनी कांबळे,   चैताली पवार  आणि  मिथुन मारणे आदी उपस्थित होते .या गावची उपसरपंच निवडणूक  बिनविरोध होण्यासाठी भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस मोहनराव इंदलकर, उद्योजक विठ्ठल मोरे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील मारणे,सामाजिक कार्यकर्ते  भैरू पवार  ,सुनील मोरे सुहास गोगावले, चंद्रकांत मोरे ,शरद इंदलकर, जालिंदर मारणे,  बाळासो शितोळे, सुरेश पवार, बिभीषण खुटवड,सोमनाथ इंदलकर,  सोमनाथ पवार , हनुमंत मारणे  यांनी मोलाचे सहकार्य केले.

खोपी गावच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सतीश मोरे  यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
To Top