( छाया- दत्ताजी नलावडे)
-----------------------------------------------------------------
भोर प्रतिनिधी:-(विठ्ठल पवार)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या मावळा तिर्थावर मावळा जवान संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या 422 व्या जन्मोत्सव सोहळ्यात जिजाऊंना मानवंदना देण्यासाठी हजारो शिवभक्तांचा जनसागर लोटला होता. जय जिजाऊ, जय शिवराय च्या जयघोषाने ,ढोल ताशांच्या गजराने व शाहीरी पोवाड्यांच्या निनादाने राजगड तोरण्याची दरी खोरी दुमदुमून गेली होती.
जालना येथील जेष्ठ विचारवंत गजाननशास्त्री महाराज यांचा क्षात्र जगद्गुरू पुरस्काराने तर विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.
वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर व पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची पांरपारीक शासकीय महापूजा करण्यात आली. जिजाऊ पालखीचे पुजन गटविकास अधिकारी विशाल शिंदे व बाल विकास अधिकारी साधु चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखीच्या मानकरी कोल्हापूकर हातकणंगले येथील शिवकन्यां प्रतिष्ठानच्या कन्यांनी ढोल ताशांच्या गजरात ऐतिहासिक राजगड - तोरणागडाच्या राजमार्गास प्रदक्षिणा घालुन पालखी मावळा तिर्थावर आणली. जिजाऊ च्या दर्शनासाठी देशभरातील हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. कोल्हापूर च्या भैरु नार्वेकर व गिरीश नार्वेकर यांच्या शिवकालीन शस्त्रास्त्र खेळ, निगडेमोसे शाळेच्या लेझिम पथक, शाहिरी पोवाड्यांनी , बाल व्याख्यात्या स्वप्निका भोसले, शिवानी कारंडे यांच्या व्याख्यानाने शिवकाळ जागा झाला.
मावळा जवान संघटनेच्या वतिने गजाननशास्री महाराज यांना क्षात्र जगद्गुरू पुरस्कार व मानपत्र देऊन तसेच स्वराज्य रक्षक संभाजी मालीकेतील बहर्जी नाईक फेम अजय तापकीर यांचा शिवपुत्र छत्रपती शंभूराजे शौर्य पुरस्काराने तर राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव पुरस्काराने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ शितल मालुसरे व जिजामाता महिला बँकेच्या अध्यक्षा मंगल भोजने यांचा तर राष्ट्रीय मावळा गौरव पुरस्काराने जेष्ठ शिवभक्त बाळासाहेब दत्तोबा पासलकर , सहकाररत्न पुरस्काराने रणजितसिंह देशमुख ,मावळा भुषण पुरस्काराने बाजीराव पारगे , युवराज वासवंड ,युवा समाजसेवक पुरस्काराने अक्षय सातपुते ,अरुण शेळके, अशिष ढगे, तसेच छत्रपती महाराणी ताराराणी गौरव पुरस्काराने मयुरी देसाई ,युवा उद्योजक पुरस्काराने शुभम भोसले,आदर्श शिक्षक पुरस्काराने प्राचार्य सुनील कदम, श्रीकांत ढमाळ, रोहिणी शेटे ,अलका पाटील विलास जोरी यांचा सन्मान करण्यात आला . तर दुर्गम भागातील उल्लेखनीय सेवेबद्दल विशेष मानपत्र देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, विस्तार अधिकारी महेश दळवी ,ग्रामसेवक नितीन ढुके ,श्रीनिवास माने व पोलीस जवान अक्षय बर्गे यांचा सन्मान करण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी प्रास्ताविक केले.
लेखक प्रा. नामदेवराव जाधव , सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, गोविंद गोपाळ यांचे वंशज राजेंद्र गायकवाड , वेल्हे पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, उपसभापती सीमा राऊत,जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, माजी सभापती संगीता जेधे,सदस्या अनिता इंगळे, लालासाहेब पासलकर, सरपंच गोरक्ष शिर्के ,संजय कंक ,भगवान शिंदे , प्रविण कांरडे ,संभाजी चेंडके,आदी उपस्थित होते. संयोजन बाळासाहेब सणस ,ह.भ.प.विजय तनपुरे ,संतोष वरपे, तानाजी भोसले, तानाजी मरगळे , लक्ष्मण दारवटकर , हणुमंत दिघे, अविनाश रांजणे, पप्पू गुजर,, संजय भिंताडे, संदिप वाडेकर, उमेश आहिरे आदींनी केले.
