उषा राशीनकर यांचे अकाली निधन....."नसरापूरच्या काकू हरपल्या"

Maharashtra varta
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
भोर :(प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

नसरापूर ता. भोर येथील आदर्श सामाजिक ,आध्यात्मिक कार्यकर्त्या उषा लक्ष्मण राशीनकर
(वय 65) यांचे  नुकतेच अल्पशा आजाराने निधन  झाले. नसरापूरचे गावच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता."लहानमोठ्यांच्या त्या आवडत्या काकू होत्या." त्यांच्या निधनाने नसरापूर  गावावर व पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. 
त्यांच्या अंत्यसंस्कार वेळेस भोर,वेल्हे तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या मागे 1मुलगा,  4 विवाहित मुली ,सुना नातवंडे  असा परिवार आहे.नसरापूर लक्ष्मी सुपर मार्केटचे चेअरमन  व नटराज युवक मंडळाचे मा. अध्यक्ष गणेशशेठ  राशीनकर यांच्या त्या मातोश्री होत.
अश्या विनम्र स्वभावाची आई(काकू)अचानक  हरपल्यात,त्या कधीही परतून न येण्यासाठी, दिवस जातील,महिने जातील,मात्र आई समान काकूंची आठवण आमच्या मनातून जाणार नाही. 

"आई लेकराची माय असते....
 वासराची गाय असते...
 दुधाची साय असते...
 लंगड्याचा पाय असते.. 
धरणीची ठाय असते...
 आई असते ,जन्माची शिदोरी...
 सरतही नाही आणि उरतही नाही"..

प्रेमळ वात्सल्यसिंधु ,परोपकारी स्नेहतेच दर्शन घडविणाऱ्या आदर्श माता, आदर्श सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्त्या उषा लक्ष्मण राशिनकर होत.आपल्या जीवनप्रवासात कुंटुबाला प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता संघर्ष करण्यास शिकवून उभ्या करणाऱ्या दीपस्तंभ होत्या.त्यांच्या अचानक, अकाली निधनाने राशीनकर परिवारावर व पंचक्रोशी परिसरावर शोककळा पसरली आहे.अश्या आदर्श मातेस काकूंना महाराष्ट्र वार्ताच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
-----------------------------------------------------------------
To Top