खेड -शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीचे सदस्य")
----- ------------------------ -------------------------------
भोर (प्रतिनिधी)विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाइन)
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम दादा थोपटे व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर ,पुरंदर हवेलीचे आमदार संजय राव जगताप हे शुक्रवार( दि 17 )रोजी रखडलेल्या पुणे-सातारा महामार्गाच्या कामांची पाहणी करून आढावा घेऊन याबाबत अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणार आहेत.
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी काल दिनांक11जानेवारी 2020 रोजी भोर दौऱ्यावर आल्या असताना खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने त्यांची भोर येथील विश्रामगृहावर भेट घेऊन कृती समितीच्या वतीने चाललेल्या प्रयत्नांची, लढ्याची माहिती देणारे निवेदन दिले. यावरखासदार सुप्रियाताई सुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे एक तास कृती समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. केंद्रीय पातळीवर नितीन गडकरी यांच्या बरोबर चर्चा करून या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. याकरिता पुणे जिल्हाधिकारी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, दिल्ली येथील संबंधित अधिकारी यांच्यासोबत फोन लावून सूचना करून कृती समिती तिच्या सदस्यांशी थेट संवाद साधून दिला.
यावेळी कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर दिलीप अप्पा बाठे, लहूनाना शेलार, पोपट काका जगताप डॉ. संजय जगताप ,शहाजी आरसुळ, जीवन आप्पा कोंडे, विलास बापू बोरगे, गोरख मानकर, शुभम यादव ,राजेंद्र कोंडे, अमर बुदगुडे दादा पवार व समितीचे सदस्य उपस्थित होते .
""17 जानेवारी 2020 या दिवशी सकाळी 11 वाजता बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संग्राम दादा थोपटे, आमदार संजय राव जगताप, आमदार भीमराव अण्णा तापकीर, हे पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करण्यासाठी व अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी महामार्गास भेट देणार असून यावेळी पुणे जिल्हाधिकारी, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार व कृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहून पाहणी करून हा अहवाल केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवणार असल्याची माहिती "महाराष्ट्र वार्ता ला" देण्यात आली.
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
