(राष्ट्रीय रस्ता सुरक्षाबाबत जनजागृतीबाबत नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन )
------------------------------------------–-----------------------
भोर प्रतिनिधी:-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
३१ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापुर टोल नाक्यावर मोठ्या उत्साहात करण्यात आली. त्यानिमित्त सारोळा वाहतूक पोलिस,राजगड पोलिस व खेडशिवापुर टोलनाका यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे मोठ्या स्वरूपात आयोजन केले आहे. या सड़क सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात "वाहन तपासणी, रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात आली.
११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत हे अभियान राबवले जात आहे. रस्ता सुरक्षाबाबत जनजागृतीबाबत नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय पाटील , राजगड पोलिस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे, PSTRPL चे वरिष्ठ अधिकारी अमित भटिया, त्रिवेणी मुद्राई प्रोजेक्ट लिमिटेड महाराष्ट्र राज्याचे प्रोजेक्ट मॅनेजर विशालराव भगत, टोल नाका खेडशिवापुरचे व्यवस्थापक बद्रीप्रसाद शर्मा,सिद्धिविनायक हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. राजेंद्र डिंबळे, श्लोक हॉस्पिटलचे डॉ. कर्णिक, अभिजीत गायकवाड, बनवारीलाल शर्मा, श्रीनिवास राव, समीर कदम, निकेश डेरे, सिद्धार्थ गोडबोले, आकाश चोरगे आदी मान्यवर व अन्य अधिकारी उपस्थित राहिले होते.
"यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटल चे चेअरमन डॉ.राजेंद्र डिंबळे म्हणाले ",की, अपघातानंतर गोल्डन अवर्समध्ये जवळच्या रुग्णालयात रुग्णांना दाखल करावे, हे सर्वात महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने 121 मोटर वाहन चालकांना वाहन योग्य चालवणे याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.या अभियानांतर्गत वाहनांमधील तांत्रिक दोषाबाबत तपासणी मोहीमही हाती घेतली जाणार आहे. तसेच खेड शिवापूर टोलनाका आणि शिबिराच्या ठिकाणी रस्तासुरक्षा विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले. हेल्मेट, सीटबेल्ट तपासणी मोहीम राबवली जाणार असून अपघाताच्या वेळी प्रथमोपचार बाबतही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांचीही कार्यशाळा घेण्यात येणार असून लेन कटींग, अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना गुलाब फूल देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले,तर प्रास्ताविक सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी करून उपस्थितांचे आभार बद्रीप्रसाद शर्मा यांनी मानले.
-------------------------------------------------------------------
