(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोधेगाव येथे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना)
-------------------------------------------------------------------
नगर( प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
शाळेतील शिक्षकांनी सुयोग्य ,अचूक ,कार्यक्षम पद्धतीने अध्ययन- अध्यापन केल्यास शाळेतील प्रत्येक विद्यार्थी प्रगतीच्या बाबतीत पुढे असेल.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्षमता ओळखुन त्या समृद्ध केल्यास विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होईल.अश्या गुणवत्तेने बोधेगाव येथील शिक्षक उत्कृष्ट काम करत असून "बोधेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श असून गुणवत्तेचा दर्जा उत्कृष्ट आहे" असे गौरव उदगार खासदार डॉ. सुजयजी विखे पाटील यांनी काढले.
"जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोधेगाव येथे खासदार डॉ.सुजयजी विखे पाटील यांनी "खासदार आपल्या गावी "या उपक्रमाअंतर्गत भेट दिली".
बोधेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन ,टाळ्यांच्या गजरात केले.बोधेगाव शाळेचे शैक्षणिक गुणवत्तापूर्ण उपक्रम,व विद्यार्थ्यांची शिस्त आणि सहशालेय उपक्रम पाहून खासदार यांनी शाळेचे विशेष कौतुक केले.नगर जिल्ह्यातील आदर्श शाळेचा बोध घ्यायचा असेल तर बोधेगाव शाळेला भेट द्यावी.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कमी होत आहेत असं म्हणतात, परंतु बोधेगाव शाळेत 500 च्यावर पटसंख्या आहे. त्यामुळे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विशेष कौतुक करायला पाहिजे. महाराष्ट्रातील मोठया पटसंख्या असणाऱ्या शाळेत व्हर्चुअल क्लास रूम तयार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, याची सुरुवात बोधेगाव शाळेपासून होईल, असे मत व्यक्त केले.मराठी शाळेतील मुलांनाही तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेता यावे. याकरिता प्रोजेक्टर शाळेला पुरवले जाईल. समाजमंदिर व रस्ते यांच्या अगोदर शाळेच्या विकासाला प्राधान्य सर्व खासदार यांनी दिले पाहिजे असे मत खासदार डॉ. सुजयजी विखे यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोधेगाव शाळेचे आदर्श मुख्याध्यापक चंद्रकांत लबडे सर,शिक्षक महेश कराड ,संतोष राठोड ,किरण बैरागी ,श्रीकांत पालवे,चंद्रशेखर पाटील,अरुण पठाडे,संदीप बडे,मंगल निकम ,कल्पना बटुले,संगीता बडे,अंजली चव्हाण,सुजाता उनवणे,मेनका ढाकणे,वर्षा झिरपे, जयश्री राठोड उपस्थित होते तसेच केंद्र प्रमुख ढाकणे साहेब,गावचे सरपंच उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ,सदस्य ,पत्रकार आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
::::::::::;:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
