"भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेशतात्या भेगडे यांची बिनविरोध निवड''..

Maharashtra varta
--------------------------------------------------------------
पुणे (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने विद्यमान जिल्हाध्यक्ष गणेशतात्या किसनराव भेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भेगडे यांच्या निवडीची घोषणा केली. भेगडे यांच्या अर्जावर डॉ. ताराचंद कराळे यांनी सूचक म्हणून तर विनायक ठोंबरे यांनी अनुमोदन दिले.

 तळेगावात मंगळवारी (ता. 14) झालेल्या पुणे जिल्हा ग्रामीण संघटन पर्व अंतर्गत जिल्हाध्यक्ष निवडणूक कार्यक्रमात माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिगंबर भेगडे ,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, वासुदेव काळे ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती ताई सोमवंशी, मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, तळेगाव शहराध्यक्ष  संतोष दाभाडे, तळेगाव शहर अध्यक्षा चित्रा जगनाडे उपस्थित होते. 

गणेश भेगडे हे उत्कृष्ट युवा संघटक व  अभ्यासू  सामाजिक राजकीय नेता म्हणून पुणे जिल्ह्यात परिचित आहेत.सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या गणेश तात्या भेगडे यांची फेरनिवड झाल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
-------------------- --------- -  -- ------------------------------
To Top