अमित गाडे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने मोठ्या उत्साहात संपन्न..

Maharashtra varta
(अमित भाऊ गाडे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत  आपला वाढदिवस साजरा करत भोर तालुक्यात सामाजिक आदर्श निर्माण केला )
---  --------------  - ------------- ----- ------------------ -- ---
भोर (प्रतिनिधी):- विठ्ठल पवार 
महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन

कापूरहोळ ता. भोर  येथील वीर धाराऊ माता गाडे पाटील ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष व युवा उद्योजक अमितदादा गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले .
भोर शहरातील, भोर एज्युकेशन सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयाच्या वस्तीगृहातील या  विद्यार्थ्यांना मोफत धान्य, फळे ,व खाऊचे वाटप वीर धाराऊ माता गाडे पाटील स्मारक ट्रस्ट तर्फे करण्यात आले . अमित भाऊ गाडे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत  आपला वाढदिवस साजरा करत भोर तालुक्यात सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारच्या वायफळ खर्च न करता मुलांना मदत करावी हा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून मूकबधिर गरजू विद्यार्थ्यांची गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जपत आवश्यक धान्य व फळांचे खाऊ वाटप करून आपल्या वाढदिवसानिमित्त करून तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी धाराऊमाता ट्रस्टचे अध्यक्ष अमित गाडे पाटील ,उपाध्यक्ष जनार्दन बाबा गाडे पाटील, सदस्य तुळशीराम आहिरे, ह. भ. प. जितेंद्र महाराज गाडे पाटील ह. भ .प .नवनाथ महाराज गाडे पाटील, ,प्रतापगड उत्सव समितीचे उपाध्यक्ष विनायक काका सणस ,ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सुरेश भाऊ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर व शिवभक्त रोहित देशमाने आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक  शरद जाधव सर यांनी केले.  उपस्थित मान्यवरांचे आभार संदीपराव जगदाळे यांनी मानले.
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
To Top