(पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे यांचा विशेष सन्मान करताना भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे.)
-----------------------------------------------------
कापूरहोळ (प्रतिनिधी) विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्याचा विकास हा केवळ मूलभूत सोयी सुविधा पुरता मर्यादित नसून,त्याच बरोबरच भोर तालुक्यातील तळागाळातल्या शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना घराघरापर्यंत, माणसा माणसापर्यंत पोहचवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आगामी काळात मोठ्या ताकतीने करणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे यांनी केले.
मंगळवार (दि. 14 )पंचायत समिती सभागृहात भोर पंचायत समिती व भोर तालुक्यातील सामाजिक संस्था, ग्रामसेवक प्राथमिक शिक्षक, सरपंच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाल्याबद्दल "रणजीत दादा शिवतरे व भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, उपसभापती दमयंती जाधव यांचा विशेष सत्कार" आयोजित करण्यात आला होता. या सर्वांचा सत्कार भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी शिवतरे बोलत होते, याप्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, गटशिक्षणाधिकारी अशोकराव गोडसे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे ,उपसभापती दमयंतीताई जाधव, पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतदादा बाठे ,खंडाळा पंचायत समितीचे मा. सभापती एस .वाय. पवार,रवींद्र बांदल,सरपंच रेखा टापरे, मनोज खोपडे ,शिक्षक संघटनेचे नेते चांगदेव नाना मसुरकर, सुदाम ओंबळे,महेंद्र अप्पा सावंत, संजय पवार, महेंद्र शिंदे, विजयकुमार थोपटे,प्रकाशभाऊ तनपुरे,पर्वत नाना कुमकर, स्वप्नील जाधव, ग्रामसेवक संघटनेचे एन. डी. शिवरकर ,प्रसाद सोले, पद्माकर डोंबाळे, राम मदने,हनुमंत पोळ यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे म्हणाले की, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक माणसाला अमूल्य संधी मिळत असते,त्या प्रकारे मला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदाच्या रुपाने ही अमूल्य संधी मिळाली असून त्या संधीचे सोने करून दाखवणार आहे. राज्यात व देशात सर्वात मोठी नावलौकिक असणारी पुणे जिल्हा परिषद आहे .पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भोर तालुक्याचा व पुणे जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णपणे लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी भोर तालुक्यास आणून ती प्रलंबित कामे पूर्णत्वाला नेली जातील,असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विठ्ठल दानवले यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोकराव गोडसे यांनी केले.
------------////------/----/////-//----------------//////------
