(नीरा-देवघर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचा शासन आपल्या दारी या पद्धतीप्रमाणे शासकीय कर्मचारी आणि शेतकरी यांचा कॅम्पला लावावा, म्हणून जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना भोर तालुक्यातील विविध संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असताना)
कापूरहोळ(प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
नीरा-देवघर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचे "शासन आपल्या दारी "कार्यक्रम लवकरात लवकर घेऊन नीरा-देवघर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारच असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
नीरा-देवघर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचा शासन आपल्या दारी या पद्धतीप्रमाणे शासकीय कर्मचारी आणि शेतकरी यांचा कॅम्पला लावावा, म्हणून जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना भोर तालुक्यातील विविध संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.त्यावेळेस राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील प्रहार अपंग संघटना व कृष्णाई जनसेवा संस्थेच्या वतीने बापू कुडले ,बाबाजी साळेकर, समीर घोडेकर,विनायक कोंढाळकर ,राजेंद्र कोंढाळकर विनायक मालुसरे, शांताराम खाटपे ,भानुदास दूधाणे ,नयनभाऊ पुजारीआणि शेतकर्यांच्या वतीने जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले. भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरणाच्या बुडीत क्षेत्रात 20 गावे बाधित झाली आहे. सदर गावातील खातेदारांना मागील वीस वर्षापासून मोबदला अद्याप मिळालेला नाही. आणि त्याबाबत प्रकरणे प्रलंबित आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक किंवा शासकीय कामासाठी धरणग्रस्तांच्या दाखल्यांसाठी मागील 20 वर्षांपासून धरणात जमिनी जाऊन संसार उघड्यावर आलेले शेतकरी शासनदरबारी हेलपाटे मारीत आहेत. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शासन आपल्या दारी प्रमाणे शासकीय कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कॅम्प लावून शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
