.नसरापूरने घेतला मोकळा श्वास........नसरापूरच्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढणेस केले सहकार्य.....

Maharashtra varta
(नसरापूरच्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढणेस केले सहकार्य....छाया वैभव भूतकर)
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
भोर (प्रतिनिधी )
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

नसरापूर ता. भोर येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी प्राथमिक कारवाई व नोटीसा बजावण्याचे काम सार्वजनीक बांधकाम विभाग,महसुल विभाग,पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत नसरापूर यांच्या संयुक्त कारवाईत करण्यात आली.यावेळी काही व्यापाऱ्यांनी सहकार्य करत स्वतःहा अतिक्रमण काढले तर 55 जणांना 27 जानेवारी पर्यंत अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
            

 नसरापूर मधील वाहतुक कोंडी संपण्यासाठी तसेच नसरापूर बाजारपेठेच्या हितासाठी होत असलेल्या आजच्या संयुक्त कारवाईचे अनेक व्यापाऱ्यांनी स्वागत करुन स्वतःहा आपापल्या दुकाना समोरील अतिक्रमण काढुन कारवाईस सहाकार्य केले. काही ठिकाणी पक्के बांधकाम,शेड व मोठे लोखंडी फलक होते अशा व्यापाऱ्यांनी दोन दिवसात ते काढुन टाकणार असल्याचे यावेळी सांगितले.
                 
या कारवाईसाठी राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे,फौजदार एन. एस. मगदुम यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचे मोठे पथक,सार्वजनीक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पी. जी. गाडे,नायब तहसिलदार बबनराव तडवी, मंडलाधिकारी एस. बी .कंडेपल्ली,नसरापूरचे सरपंच डॉ गणेश हिवरेकर,सदस्य गौरव बागमार, ग्रामविकास अधिकारी अभय निकम,तलाठी जे. डी .बरकडे,पोलिस कर्मचारी सचिन काळे,आदींसह महसुल व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावा मधील जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
               
आज सकाळ पासुनच ग्रामस्थ व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या गटारा पुढील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती .प्रत्यक्ष कारवाई सुरु झाल्यावर सर्वांनी सहकार्य केले. अभियंता पी. जी. गाडे व मंडालाधिकारी कंडेपल्ली  यांनी माहीती देताना सांगितले कि, आज प्राथमिक कारवाईत व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे. ज्यांचे बांधकाम,शेड किेंवा मोठे लोखंडी फलक आहेत. त्यांना नोटीस देण्यात आल्या असुन 27 जानेवारी पर्यंत दोन्ही बाजुच्या गटारा पुढील अतिक्रमण काढण्याचे संबधीत व्यापारी दुकानदार यांनी सांगितले असुन तसे झाले नाहीतर 27 जानेवारी रोजी प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाईल.

             सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता अश्विनी घोडके या कारवाईस उपस्थित नव्हत्या, त्यामुळे उपस्थितांकडुन तीव्र  नाराजी व्यक्त करण्यात आली.
-------------------------------------------------------------------
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
To Top