भोर तालुका पत्रकार संघास,वसंतराव काणे "आदर्श तालुका पत्रकार संघ" पुरस्कार जाहीर

Maharashtra varta

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
भोर (प्रतिनिधी):- विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि राज्यातील 354 तालुक्यात शाखा विस्तार असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी राज्यातील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते.वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार,भोर तालुका पत्रकार संघास देण्यात येणार आहे.




राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या मेळाव्यात दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा होत असतो.यंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि मेळावा सोलापूर जिल्हयात अक्कलकोट येथे 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न होत आहे.त्यानुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी  2019 च्या आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या नावाची घोषणा केली आहे.

"वसंतराव काणे आदर्श तालुका संघ पुरस्कार ,भोर तालुका पत्रकार संघास  घोषित कऱण्यात आला आहे."

भोर  तालुका पत्रकार संघानं पत्रकारांचे मजबुत संघटन उभारण्याबरोबरच पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजनेच्या लढयात मोठाच सहभाग नोंदविला आहे.व या पत्रकार संघानं भोर तालुक्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषदेने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

वसंतराव काणे यांच्या नावाने राज्याच्या प्रत्येक विभागातून एक या प्रमाणे आठ तालुक्यांची निवड केली जाते व त्यांना सन्मानित करण्यात येते.पत्रकार संघटन,परिषदेच्या उपक्रमातील सहभाग,सामाजिक कार्य आदि गोष्टींचा निवड करताना विचार केला जातो.

 8 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते भोर तालुका पत्रकार संघास सन्मानित करण्यात येणार आहे.शाल,श्रीफळ,मानपत्र आणि परिषदेचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.पुरस्कार प्राप्त सर्व जिल्हा आणि तालुका संघाचे एस.एम.देशमुख,परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी लोणकर, सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

मागील सर्व तालुका पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याप्रमाणेच अक्कलकोट मेळावा देखील यशस्वी करायचा असल्याने राज्यातील सर्व तालुका संघांचे पदाधिकारी तसेच पत्रकारांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी  केले आहे.
-------------------------------------------------------------------

To Top