"न-हे (भोर)गावचा सिध्देश वीरला भारत विरुध्द श्रीलंका या क्रिकेट सामन्यात" मॅन ऑफ द मॅच" चा पुरस्कार'".... .

Maharashtra varta
(सिध्देश वीर ला (ICC UNDER 19 )वर्ल्डकप स्पर्धेतील "सामनावीर" 'मॅन ऑफ दी मॅच "या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.)
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
भोर (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

भोर तालुक्यातील नऱ्हे गावचा सुपुत्र  सिद्धेश
अशोकराव वीर याने ICC UNDER 19(युवा विश्वकरंडक स्पर्धा) वर्ल्डकप स्पर्धेतील (दि.19 जानेवारी)रोजी झालेल्या श्रीलंके विरुद्ध च्या  सामन्यात नाबाद 44 धावा काढत 35 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ,तसेच  गोलंदाजी करताना २ विकेट घेऊन युवा विश्व करंडक स्पर्धेत (ICC UNDER 19)श्रीलंकेला हरवून भारताची शानदार सलामी केली. या स्पर्धेत सिद्धेश वीर याने  अष्टपैलू  कामगिरी करत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
त्याबद्दल सिध्देशला ICC UNDER 19 वर्ल्डकप स्पर्धेतील "सामनावीर" 'मॅन ऑफ दी मॅच "या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या  युवा विश्व करंडक स्पर्धेत भारतीय युवक संघाने आपण प्रबळ विजयाचे दावेदार आहोत हे दाखविताना श्रीलंकेला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही.

भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारत या संधीचे सोने करत पुरेपूर फायदा घेत भारताच्या डावातील  पाच  भागीदारांपैकी एकही श्रीलंकेस झटपट मोडता आला नाही.आणि श्रीलंकेस दुसऱ्या विकेटची 87 धावांची भागीदारी सोडल्यास श्रीलंकेची अन्य कोणतीही जोडी जमली नाही.


सिद्धेश अशोकराव वीर  याची फलंदाजी व गोलंदाजी उत्कृष्ट ,पाहण्यासारखी होती. भारतीय संघाच्या शानदार सलामीत सिद्धेशचा वाटा मोठा असून आदर्श आहे.


सिद्धेश वीरने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोशल मीडियावर व भोर तालुक्यातून व पुणे जिल्ह्यातून विविध स्तरातून सिद्धेश्वर वर  अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होतो आहे. सिद्धेशच्या भोर तालुक्यातील मूळ गावी नऱ्हे येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.हा क्षण व आनंद ,सिद्धेशची कामगिरी भोर तालुका व महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची असल्याचे मत "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना नागरिक व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त  केले आहे.
----------------------------------------------------------------–
###############################
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विठ्ठल पवार.
मो. नं.९२२६८००७८३
""""""""''"'""""'''''''''"'''"""""'""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
To Top