(मकरसंक्रांतिनिमित्त महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमात महिलांना आरोग्य,आहारविषयक मार्गदर्शन करतानापुणे जिल्ह्याच्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रिया देशपांडे)
-----------------------------------------------------------------
भोर (प्रतिनिधी )विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
महिलांनी व मुलींनी आरोग्याबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. आरोग्य बद्दलच्या वाटणाऱ्या समस्या व आरोग्यविषयक तक्रारी व्याधी अंगावर काढून वर वर उपचार करणे, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नियमितपणे आरोग्य तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे व उपचार घेऊन आरोग्य चांगले कसे राहील ,याकडे महिलांनी सर्वतोपरी लक्ष द्यावे असे आवाहन पुणे जिल्ह्याच्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रिया देशपांडे यांनी केले.
ज्ञानदीप को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ,नसरापूर व तनिष्का व्यासपीठ नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतिनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम व महिलांसाठी आरोग्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाकरिता नसरापूर पंचक्रोशी परिसरातील 220 महिलांनी सहभाग नोंदवला.
नसरापूर ता. भोर येथे ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नसरापूर च्या कार्यालयात संपन्न झाला.
"आहारातून निरामय आरोग्याकडे" या विषयावर आधारित व्याख्यान प्रसिद्ध स्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. महिलांना आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या समजावून घेऊन मार्गदर्शन केले.
तनिष्काच्या नसरापूरच्या प्रतिनिधी सौ. वैशाली झोरे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या मांडत तनिष्का महिलांसाठी विविध उपक्रम राबवत महिलांना सशक्त करण्याचे काम करीत आहे.असे नमूद केले
मकरसंक्रांतिनिमित्त महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक महिलेला संक्रातीचे वाण म्हणून संसारापयोगी वस्तू भेट ,ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नसरापूरच्या वतीने अविनाश गायकवाड यांनी दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी सकाळचे उपसंपादक व तनिष्काचे सागर गिरमे,सकाळचे पत्रकार व भोर तालुका पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष किरणजी भदे, भारती रांजणे,वैशाली झोरे,कविता परदेशी,सपना झोरे, मेनका शेटे व इतर महिला -भगिनी व मान्यवर बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत ज्ञानदीपचे प्रतिनिधी संजयराव घाटे यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदीपचे शाखाप्रमुख अविनाश गायकवाड यांनी करून प्रभावी सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले. तर आभार अनिल चव्हाण यांनी मानले.
----- ----------------------------------------------------------
