"तेलवडी येथे गरोदर व स्तनदा मातांचा मेळावा संपन्न"

Maharashtra varta
(तेलवडी ता.भोर येथे गरोदर व स्तनदा महिलांना  बेबी किटचे तसेच बेबी ड्रेस चे वाटप करताना)
------------------------------------------------------------------
भोर (प्रतिनिधी ):
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

गरोदर व स्तनदा महिलांना स्वतःबरोबर दुसरा एक जीव वाढवताना अगदी शुल्लक वाटणार्‍या पण अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले. तर माता व बाळ या दोघांचे आरोग्य व पोषण योग्य होऊन कुठलाही आजार होणार नाही. या सर्वांची पुस्तकी माहिती न सांगता प्रत्यक्ष कृतीतून आहारात काय बदल करावे. जेणेकरून कुपोषणामुळे होणारे आजार जे पुढे इतर आजारांना निमंत्रित करतात. ते टाळता येईल त्यासाठी गरोदर व स्तनदा महिलांनी आपल्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जे.जी. कापसीकर यांनी केले.

 तेलवडी ता. भोर येथे गरोदर व स्तनदा मातांचा मेळावा देवराई कृषी पर्यटन केंद्र, तेलवडी या ठिकाणी संपन्न झाला. ग्राम आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा समिती ग्रामपंचायत तेलवडी यांच्या वतीने सचिव आशा वर्कर  सुरेखाताई धावले यांच्या पुढाकाराने व नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र कासुर्डी यांच्या द्वारे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी नसरापूर चे प्राथमिक आरोग्य अधिकारी कापसीकर बोलत होते. यावेळेस महिलांना आहाराचे महत्व नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र कासुर्डी च्या आरोग्य सेविका  गौरी मांडके यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना बेबी किटचे तसेच बेबी ड्रेस चे वाटप करण्यात आले. तर महिलांना या वेळेस पोषणयुक्त डोहाळे जेवण  देण्यात आले. 

या कार्यक्रमा प्रसंगी भोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. व्ही. चांदगुडे , तेलवडीचे सरपंच दत्तात्रय धावले, तेलवडी चे माजी सरपंच संतोष धावले, ..देवराईचे युवा उद्योजक चैतन्य मुळे,नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी कापसीकर ,आशाच्या सुपरवायझर सीमाताई मालुसरे,  अनिल नाईक ,विजय साळुंखे, राजेंद्र मोरे, प्रसाद चव्हाण, बाळासाहेब पवार, आप्पासाहेब शिंदे, संदीप धावले यावेळेस उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल नाईक यांनी करून आभार बाळासाहेब पिसाळ यांनी मानले.
-------------------------------------------------------------------

To Top