भोर शिक्षक पतसंस्थेचे चेअरमनपदी भीमराव शिंदे व व्हाइस चेअरमनपदी शीतल टापरे.

Maharashtra varta
(भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी भीमराव शिंदे तर व्हाइस चेअरमनपदी शीतल टापरे यांची बिनविरोध निवड  झाल्याने सर्व संचालक व शिक्षक पदाधिकारी व सभासद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा देताना.(छाया---विठ्ठल पवार.)
"""""""""""""""""""""""""""""""""""""'''''''''''''''''''''""""""""""'""""'"""""""
कापूरहोळ   ( प्रतिनिधी):  -विठ्ठल पवार.
    (महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी भीमराव शिंदे तर व्हाइस चेअरमनपदी शीतल टापरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन (संदीप दानवले)व व्हाइस चेअरमन (एकनाथ अवचरे)यांचा विहित कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामे दिले. त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची बुधवार (दि.22)जानेवारी रोजी निवड करण्यात आली. भोर येथील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी भोरचे  सहाय्यक निबंधक अधिकारी पंढरीनाथ घुगे हे होते. 

यावेळेस भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सर्व संचालक व  पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे,भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे,महेंद्रअप्पा सावंत ,सरचिटणीस विजय कुमार थोपटे ,बापूसाहेब जेधे,  आनंता आंबवले, विकास खुटवड ,आनंदा बांदल, राजू चव्हाण ,राजू दामगुडे ,सुनील लेकावळे, विजय कारभळ, राजू बांदल, विठ्ठल दानवले ,हनुमंत दूरकर ,रामचंद्र कुमकर , विजया झगडे, शैला कोठावळे ,भारती गायकवाड, निलिमा शिंदे,सुजाता दळवी, सचिव जयवंत जाधव तसेच बालवडी, नांद,वेनवडी बाजारवाडी वडगावचे ग्रामस्थ या वेळेस बहुसंख्येने उपस्थित होते.

 पतसंस्थेच्या चेअरमनपदी भीमराव शिंदे तर व्हाइस चेअरमनपदी शीतल टापरे यांची बिनविरोध निवड  झाल्याने सर्व संचालक व शिक्षक पदाधिकारी व सभासद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


(महाराष्ट्र वार्ताशी बोलताना नवनिर्वाचित  चेअरमन भीमराव शिंदे म्हणाले की भोर  तालुक्यात नावलौकिकास पात्र ठरलेली शिक्षक पतसंस्था आहे. सभासद व संस्थेचे हित लक्षात घेऊन प्रभावी काम करणार आहे).


(व्हाईस चेअरमन शीतल टापरे म्हणाल्या ,की गेली अनेक वर्षे शिक्षक संघटनेत चांगलं काम करीत असताना या चांगल्या कामाचे फळ हे पद आहे. पदाच्या माध्यमातून सभासद व संस्था यांच्या उन्नतीसाठी विशेष काम आम्ही सर्व संचालक करणार आहोत.)
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
To Top