"खेड-शिवापूर टोल नाक्याचा निर्णय चार दिवसात घ्या, सर्वपक्षीय समितीचा आंदोलनाचा इशारा.....

Maharashtra varta
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
कापूरहोळ (प्रतिनीधी ):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाका हलवण्याचा ठोस निर्णय येत्या चार दिवसात घ्यावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपल्यावर राहील, असा इशारा सर्वपक्षीय समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे.
बुधवारी खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर, दिलीप अप्पा बाठे, शैलेश सोनवणे ,बाळासाहेब गरुड, लहू नाना शेलार, आदींनी प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांची भेट घेऊन तीव्र संताप व्यक्त केला. येत्या चार दिवसात सदर टोलनाका पीएमआरडी हद्दीच्या वीस किलोमीटर पुढे हलवावा अशी मागणी केली. या रस्त्याचे सहापदरी करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रा कंपनीने ऑक्‍टोबर 2010 मध्ये सुरू केले. 
अडीच वर्षात काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. प्रत्यक्षात सहा वेळा मुदतवाढ मिळूनही काम पूर्ण झाले नाही या कालावधीत अनेक लहान-मोठे अपघात होऊन शेकडो जण मृत्युमुखी पडले. काही जण जखमी झाले .अनेकांना अपंगत्व आले .झालेले काम निकृष्ट विहित दर्जानुसार झालेले नाही. लेखा समितीने आक्षेप नोंदवले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने सुद्धा कामात अनेक त्रुटी दाखवल्या असून काम सदोष असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे .
गेल्या महिन्यात कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्याचे काम पूर्ण कृती समितीने करावे. तोपर्यंत टोल वसुली करू नये. टोल नाका हलवावा या समितीच्या मागण्या मुख्य असून त्यानुसार कार्यवाही करावी. अशा सूचना दिल्या होत्या त्यावर काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे टोल नाका हटाव कृती समिती अधिकाधिक आक्रमक झाली आहे. यावर तातडीने निर्णय घ्यावा असे समितीने महाराष्ट्र वार्ता च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
To Top