(कापूरहोळ नारायणपूर रोडचे खड्डे बुजवलेे हे दाखविताना भोर ,वेल्हा, मुळशीचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर अमोलिक व भोर तालुका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सतीश अडसूूूळ)
-----------------------------------------------------
कापूरहोळ (प्रतिनिधी)-
कापूरहोळ ते नारायणपूर रोड वर भलेमोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात दूर अवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत असताना यांनी संबंधित विभागाने सात दिवसात खड्डे न बुजवल्यास रिपब्लिकन सेनेचे भोर, वेल्हा , मुळशीचे अध्यक्ष किशोर अमोलिक यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, याबाबत रिपब्लिकन सेनेच्या पाठपुराव्यास यश आले असून हे सर्व खड्डे बुजवले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्याचे यापूर्वी काम झाले होते. मात्र मुसळधार पावसामुळे हा रस्ता खड्ड्यात गेला की काय असं वाटू लागलेलं होत.तसेच साईड पट्टी देखील खचल्या होत्या. कापूरहोळ ते दिवळे गावच्या हद्दीमध्ये भलेमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांचे अनेक अपघात झाले आहेत. काहीजणांना यामुळे अपंगत्व आलेले आहेत. या मार्गाने गाड्यांची रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर ये-जा चालू असते. आणि या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे खड्डे बुजवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेने व ग्रामस्थांनी दिलेली आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे बापूसाहेब कांबळे, भोर,वेल्हा, मुळशी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर अमोलिक भोर तालुका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सतीशदादा आडसूळ,भोर शहर महिला अध्यक्षा नजमा बाबी काझी,भोर तालुका वंचित बहुजन आघाडी च्या महिला तालुकाध्यक्ष वेणूताई भोसले.सागर गायकवाड,उद्योजक मेघराज रजपूत, पप्पू जगताप आदी उपस्थित होते.
(भोर तालुका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व युवा नेते सतीश दादा अडसूळ म्हणाले की ,भोर तालुक्यातील विविध सामाजिक समस्या गोरगरीब वंचित माणसांसाठी प्रभावीपणे काम करून दाखविणार आहे).
