:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
भोर (प्रतिनिधी)..विठ्ठल पवार.(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन):-
भारतीय जनता पक्ष, भोर मतदार संघातील संघटनात्मक निवड जाहीर होत असताना यामध्ये भोर तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी केळवडे गावचे व भारतीय जनता पक्षात सक्रियपणे काम करणारे जीवन आप्पा कोंडे यांची निवड जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जाहीर केली.
यावेळी संघटक सरचिटणीस सचिन सदावर्ते, सरचिटणीस बाळासाहेब गरुड ,माजी अध्यक्ष गणेश निगडे ,प्रदिप खोपडे,अमर बुदगुडे, डॉ.नागेंद्र चोबे, विश्वास ननावरे तसेच भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जीवन अप्पा कोंडेच्या अध्यक्ष निवडीमुळे भारतीय जनता पक्षात व युवकात आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"भोर तालुका भारतीय जनता पक्षाला एक आक्रमक, कणखर, निर्भीड व सामाजिक, व राजकिय प्रश्नांचा जाण असलेले नेतृत्व मिळाले आहे.या निवडीमुळे त्यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे."
"भोर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न करू असे जीवन आप्पा कोंडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले."
