"स्वर विमल संगीत महोत्सव उत्साहात संपन्न"

Maharashtra varta
-----------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
भोर प्रतिनिधी:-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
सिद्धार्थ हॉल माणिकबाग पुणे येथे 'स्वर विमल ' संगीत महोत्सव नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवृत्त जिल्हा शिक्षण अधिकारी प्रकाश परब,  वि. ग. सातपुते (ज्येष्ठ कवी) तसेच प्रवचनकार व कवयित्री उर्मिला विश्वनाथ कराड,  मंदाताई नाईक आणि वन विभागातील अधिकारी रंगनाथ नाईकडे, उद्योजक दिपक कोंडे,  राजेंद्र कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे आयोजन स्वर विमल संगीत क्लासेसच्या वतीने पं. रवींद्र यादव व त्यांचे सुरसंगम चे सहकारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे निवेदन कवी व सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद कोंडे देशमुख आणि रमेश चांदगुडे  यांनी केले. या महोत्सवामध्ये अठरा वर्षात ज्या लेखक, कवी,  गायक यांच्या सहवासाने सांगीतिक प्रवासाला दिशा मिळाली अशा मान्यवरांना " दिशा" पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी 'स्वर मुरलीचे' हा सूरसंगम कार्यक्रम सादर करण्यात आला. उर्मिला कराड व श्री.सातपुते,श्री.परब यांच्या हस्ते गुणवंत कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ वृत्तपत्राचे सहसंपादक व विनोदी लेखक सुभाष खुटवड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. नवोदित हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे पं. रवींद्र यादव,  ह-भ-प.गायत्री कोंडे देशमुख, श्री. राजू हसबनीस यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
To Top