----- -------------------------------------------------------
भोर (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कापूरहोळ ते नारायणपूर रोड वर भलेमोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात दूर अवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत असताना यांनी संबंधित विभागाने सात दिवसात खड्डे न बुजवल्यास रिपब्लिकन सेनेचे भोर, वेल्हा , मुळशीचे अध्यक्ष किशोर अमोलिक यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्याचे यापूर्वी काम झाले होते. मात्र मुसळधार पावसामुळे हा रस्ता खड्ड्यात गेला की काय असं वाटू लागलेलं आहे. तसेच साईड पट्टी देखील खचल्या आहेत. कापूरहोळ ते दिवळे गावच्या हद्दीमध्ये भलेमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांचे अनेक अपघात झाले आहेत. काहीजणांना यामुळे अपंगत्व आलेले आहेत. या मार्गाने गाड्यांची रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर ये-जा चालू असते. आणि या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत रिपब्लिकन सेनेने व ग्रामस्थांनी व्यक्त केलेले आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे बापूसाहेब कांबळे, भोर,वेल्हा, मुळशी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर अमोलिक भोर तालुका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सतीशदादा आडसूळ,भोर शहर महिला अध्यक्षा नजमा बाबी काझी,भोर तालुका वंचित बहुजन आघाडी च्या महिला तालुकाध्यक्ष वेणूताई भोसले.सागर गायकवाड,उद्योजक मेघराज रजपूत, पप्पू जगताप आदी उपस्थित होते.
