"टोल नाका हटाव कृती समितीला,पहिल्या टप्प्यात मोठं यश"

Maharashtra varta
(खेडशिवापुर टोल नाका हटाव"कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^भोर (प्रतिनिधी):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाका हटविणे या प्रमुख मागणीसाठी लढणाऱ्या टोल नाका हटाव कृती समितीला पहिल्या टप्प्यात मोठे घवघवीत यश मिळाले असून या मागणीबाबत योग्य निर्णय तातडीने होण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक यांना पत्र दिल्याने आज समितीच्या वतीने होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. 

"कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली, यावेळी भोर ,वेल्हा ,मुळशीचे आमदार संग्रामदादा थोपटे ,दिलीप बाठे,डॉ. संजय जगताप ,माऊली दारवटकर, रोहन बाठे, विलासबापू बोरगे, गोरख मानकर, राजेंद्र कोंडे ,विश्वास ननावरे, अमर बुदगुडे,जीवनआप्पा कोंडे आदी उपस्थित होते. 
महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी पुणे यांच्या पत्राची येत्या आठ दिवसात दखल न घेतल्यास प्राधिकरणाच्या वारजे येथील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कृती समितीचे सदस्य दिलीप अप्पा बाठे  यांनी दिला आहे.
--------------------------- ---------------------------------------
To Top