------------ ---- ----------- -----------------------------------
भोर (प्रतिनिधी ):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन):-
मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत देशातील सर्व राज्यामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापक यांसाठी देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात असून शालेय गुणवत्ता वाढविणे हे प्रशिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन शिक्षक हा भावी पिढी घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक असून माझी शाळा, माझा समाज व माझा देश बलवान करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणेचे संचालक दिनकर पाटील यांनी केले.
दि. ३०/१२/२०१९ते ३/१/२०२० पर्यंत ,निर्मलाताई थोपटे महाविद्यालय भोर येथे सुरु असलेल्या पाच दिवसीय निष्ठा प्रशिक्षण वर्गाचा समारोप दि.०३/०१/२०२० रोजी झाला. याचवेळेस महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे. चे संचालक दिनकर पाटील साहेब यांनी अचानक भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
"NISTHA प्रशिक्षणानिमित्त पहिल्या भेटीत 100% प्रशिक्षणार्थीची उपस्थिती पाहून व प्रशिक्षणविषयी शालेय गुणवत्ता विकासासाठी सकारात्मक प्रतिक्रिया जाणून संचालक दिनकर पाटील समाधान व्यक्त केले".
सदर प्रशिक्षणाचे समन्वयक तथा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था(DIET)पुणेचे अधिव्याख्याता कृष्णा फडतरे यांनी शालेय गुणवत्ता विकासासाठी NISTHA प्रशिक्षण कशा पद्धतीने उपयुक्त आहे, हे उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट केले.भोरचे विषय साधनव्यक्ती सुनील गोरड यांनी आभार मानले.
