"नसरापुर येथे भरली सावित्रीबाईंची शाळा"

Maharashtra varta

(नसरापूर ता. भोर येथे शंकरराव भेलके महाविद्यालयाने सावित्रीबार्इंच्या या पहील्या शाळेची  प्रतिकॄती तयार करून १ जानेवारी १८४८ रोजीचा वर्ग पुन्हा भरविला )
-------------------------------------------------------------------
भोर (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
सावित्रीबार्इ फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे भिडे वाडयात मुलींची पहीली शाळा सुरू करत भारतीय स्त्री शिक्षणाला सुरूवात केली.सावित्रीबार्इंच्या जयंती निमित्त नसरापुर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयाने सावित्रीबार्इंच्या या पहील्या शाळेची  प्रतिकॄती तयार करून १ जानेवारी १८४८ रोजीचा वर्ग पुन्हा भरविला या उपक्रमामुळे  सावित्रीबार्इंची शाळा १७२ वर्षानंतर नसरापुरात पुन्हा अवतरली.
सावित्रीबार्इंच्या पहिल्या शाळेची प्रतिकॄती प्राचार्य डॉ. नारायण टाक यांच्या कल्पनेतून साकार झाली या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्या्रर्थीनी उस्फुर्त प्रतिसाद दिला|विद्याथीनींनी याबाबत मनोगत व्यक्त केले.समाजातिल विषमव्यवस्थे विरूथ्द बंड करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये निर्माण व्हावी याकरीता सावित्रीबार्इंनी स्त्री शिक्षणाला सुरूवात केली.सावित्रीबार्इनी केलेले कार्य व कवितांचे लेखन आजही महीला सबलीकरनासाठी मार्गदर्शक आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारायण टाक यांनी व्यक्त केले.
शाळेची प्रतीकॄती सादर करतांना सावित्री बार्इंची भूमिका आचल खुटवड या विद्यार्थीनीने साकार केली.फुले दांम्पत्याने सुरू केलेल्या नॉर्मन स्कुल मध्ये तयार झालेल्या पहील्या शिक्षिका फातिमा शेख यांची भूमिका अंकिता कोळपे हिने सादर केली.पहील्या शाळेत १.१.१९४८ रोजी अन्नपुर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनु पवार, व जानी करडीले या सहा विद्यार्थीनी दाखल झाल्या होत्या त्यांच्या भूमिका अनुक्रमे साक्षी खुटवड, स्नेहल यादव, सायली गायकवाड, शिवानी सावंत, धनश्री शिंदे, या विद्यार्थीनींनी सादर केल्या.
शाळेची प्रतिकॄती तयार करण्यात प्रा.संदिप लांडगे,प्रा.पी.वाय.गायकवाड,प्रा.भगवान गावित, प्रा.अतुल मरेवाड यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जगदिश शेवते, सूत्रसंचलन प्रा.वर्षा दसवडकर यांनी  केले तर आभार प्रा.जीवन गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.



To Top