"निगडे खे. बा. ता. भोर येथील शाळेत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार उत्साहात साजरा".....

Maharashtra varta
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खे .बा. येथे बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार)
------------------------------------------------------------------
भोर( प्रतिनिधी) :विठ्ठल पवार.
 (महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन):
विद्यार्थ्यांना गणिती विषयाची आवड निर्माण होऊन दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालणे ,नाणी, नोटा यांची भेट ओळख व्हावी, पैसे सुटे करणे,पैसे योग्य घेणें व बाकीचे देणे इत्यादी समजणे आवश्यक आहे ,त्यातूनच गणिती कौशल्य विकसित करणारा बाल आनंद मेळावा असल्याचे उदगार भोर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नानासाहेब मालुसरे  यांनी काढले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खे. बा.  ता. भोर येथे दिनांक 4जानेवारी 2020 ,रोजी  बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,अश्या नाविन्यपूर्ण उपक्रमातुन गणिती विषयाची आवड निर्माण होते.
त्याच बरोबर आठवडा बाजार देखील आयोजित करण्यात आला होता.साधारणतः 51 खाद्य पदार्थ व पालेभाज्या चे स्टॉल लावण्यात आले होते. शाळेतील शिक्षक यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष विक्री  करून घेतल्याने समजलेल्या ज्ञानाचे उपयोजन व कौशल्य पडताळता आले असल्याची माहिती निगडे खे. बा.च्या उपक्रमशील आदर्श  मुख्याध्यापिका  मंदाकिनी चाचर यांनी बोलताना सांगितले.
"शेकडो पालक व ग्रामस्थ यांनी या शाळेच्या उपक्रमास प्रतिसाद व दाद देऊन उपक्रमाचे कौतुक केले". वस्तू विकताना मुलांना खूप आनंद वाटत होता. या उपक्रमात सहभागी शाळेतील सर्व मुले सहभागी झाली होती. यावेळेस पालक व ग्रामस्थांनी खाद्यपदार्थ व भाज्या विकत घेतल्या. एका  कोपर्‍यात असणारी खाऊ गल्ली  माजी विद्यार्थ्यांची आकर्षण बनली. यात कांदा, पालक, मुळे, मेथी, टोमॅटो, गाजर,मुळा या भाज्या तर इडली ,ओली भेळ, आप्पे, चंपाकली, भाकरवडी शेवरेवडी,चिक्की सरबत ,मिठाई, गुलाब जमून  केक,थालीपीठ पाणीपुरी,असे विविध खाद्यपदार्थ मुलांनी विक्रीस आणले होते.
"सुमारे 5000 हजार रुपयांचे खाद्यपदार्थ व भाज्या एकाच तासांत विकल्या गेल्या.मुलांनी गणन, व्यवहार ज्ञान,नफा-तोटा, खरेदी-विक्री या क्रियांचा स्वानुभव घेतला.सहकार्य,नीटनेटकेपणा इत्यादी मूल्य रुजवण्यास मदत या उपक्रमामुळे होते."

यावेळेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंतराव मालुसरे, सरपंच नामदेव कुंभार,महागणपती तरुण मंडळाचे अध्यक्ष किशोरभाऊ मालुसरे,किशोर बारणे,महेश मालुसरे, ज्ञानेश्वर चिकणे,तसेच  शाळेच्या आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापिका मंदाकिनी चाचर , पदवीधर शिक्षक पंढरीनाथ धावले ,शिक्षिका ज्योती निगडे व  हेमलता काळे आदी उपस्थित होते.निगडे शाळेतील शिक्षकांनी   विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाचे गावातील सर्व नागरिक ,महिला पालक ,शिक्षणप्रेमी यांनी कौतुक करून शिक्षकांचे अभिनंदन केले.


To Top