-------------/-------/----------------------------------- - -- -
भोर (प्रतिनिधी)विठ्ठल पवार.
महाराष्ट्र वार्ता ऑनलाइन.
आधुनिक बदलती जीवनशैली , ताणतणाव, मोबाईलचा आपल्या जीवनात मर्यादेपेक्षा अधिक वापर, आहार ,विहार ,आणि विश्रांती मध्ये झालेल्या अवेळा बदल, यामुळे मनुष्याच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक खराब होत आहे. विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय, विविध आजार जडताना दिसत असताना ,प्रत्येकाने आपल्या शारीरिक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वर्षातून दोनदा आपण आपल्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन "सूर्यवंशी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे चेअरमन एम. बी. बी एस .डॉ. विराज सूर्यवंशी" यांनी केले.
नसरापूर ता. भोर येथे आधुनिक दर्जाची आरोग्य सेवा उत्तमोत्तम देणारे सूर्यवंशी हॉस्पिटल नसरापूरच्या तिसऱ्या वर्षातील पदार्पणानिमित्त व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नसरापुर या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाप्रसंगी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेल होत. दिमाखदार पद्धतीने हे आरोग्य शिबीर संपन्न झालं. समाजातील दीन,पीडित अनेक गोरगरीब गरजूंनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. सुुप्रीया चव्हाण यांची मदत व मार्गदर्शन झाले.शिबिरामध्ये ईसीजी, उच्च रक्तदाब ,मधुमेह तपासणी, आहार नियोजन मार्गदर्शन करून हृदयरोग तपासणी शिबिर देखील आयोजन करण्यात आलेल होत. हे शिबिर दिनांक 28 डिसेंबर 2019 ते 30 डिसेंबर 2019 अखेर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूर्यवंशी हॉस्पिटल नसरापूर येथे संपन्न झाले.हे शिबिर 3 दिवसांचे होत. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. भोर आणि वेल्हे तालुक्यातील 673 नागरिकांनी या शिबिरात लाभ घेतला. सूर्यवंशी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आगामी काळामध्ये ICU,ऑपरेशन थेटर उभारून त्याचा देखील लाभ नागरिकांना कमीत कमी दरामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सूर्यवंशी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे फाउंडर चेअरमन डॉ. विराज सुर्यवंशी यांनी "महाराष्ट्र वार्ताच्या" प्रतिनिधीला सांगितले.
