नेरे,आंबाडे,बाजारवाडी शाळा आदर्शवत:उपसभापती श्रीधरदादा किंद्रे यांचे प्रतिपादन-तिन्ही शाळांना सभापती चषक:

Maharashtra varta


(-"सभापती आदर्श चषक "मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना जि.प.प्राथमिक शाळा नेरेचे ग्रामस्थ,शिक्षक व व्यवस्थापन समिती :( छाया :संतोष मस्के) 
-------------------------------------------------------------------
भोर (प्रतिनिधी) :  विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)-:        
"विद्यार्थी दशेत संस्कार,गुणवत्ता तसेच भावी काळातील व्यक्तिमत्वाची जडणघडण ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्येच होत असते.भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील नेरे,आंबाडे व बाजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यास पात्र असून त्या आदर्शवत आहेत असे प्रतिपादन उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी गुणवंत गौरव कार्यक्रमात भोर येथे केले.
 भोर तालुका पंचायत समितीच्या 57 वा वर्धापन दिनानिमित्त "कर्मचारी स्नेहसंमेलन गुणवंत अधिकारी, व कर्मचारी आणि भोर पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत गुणवंत शाळा व शिक्षक यांचा गुणगौरव" करण्यात आला.यात विसगाव खोऱ्यातील आंबाडे व खानापूर केंद्रात शिक्षिका जयश्री घोडके,आशा चव्हाण,मोहिनी गायकवाड व किरण काळेल यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तर १ ली ते ४ थी ची जिल्हा परिषद प्राथमिक नेरे व १ ली ते ७ वी आंबाडे व बाजारवाडी शाळेला सभापती चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते  गौरव करण्यात आला.तालुका स्तरावर पाढेपाठांतरात वरवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा नंबर आल्याने त्यांचा व शिक्षक वृंदाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सभापती मंगल बोडके,जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे .माजी उपसभापती लहूनाना शेलार,सदस्य रोहन बाठे, संतोष घोरपडे,वंदना धुमाळ,,दमयंती जाधव,गटविकास अधिकारी विशाल तनपुरे,गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे,शिक्षक संघटना अध्यक्ष सुदाम ओंबळे,शिक्षक नेते पंडित गोळे,मनोज खोपडे,केंद्रप्रमुख बापू जेधे,प्रदीप बदक,पोपट निगडे,विजय थोपटे,शिक्षक समितीचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, संजय पवार,अमर बुदगुडे, राजीव केळकर व नेरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व लोकमत पत्रकार संतोष म्हस्के आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूूत्रसंचालन विठ्ठल दानवले यांनी केले ,तर आभार गटशिक्षणाधिकारी अशोकराव गोडसे यांनी मानले. 
-------------------------------------------------------------------


         
To Top