भोरला तालुका विज्ञान प्रदर्शन, उत्साहात संपन्न..

Maharashtra varta
... भोर (प्रतिनिधी) 
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत झालेल्या भोर पंचायत समिती भोर यांच्या माध्यमातून,तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 
या विज्ञान प्रदर्शनात तालुका भोर येथील संत लिंगणाथ स्वामी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळवला तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या आर्या शेटे, प्रांजल गोळे, रसिक कोंढाळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला .भोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उपसभापती श्रीधर किंद्रे यांच्या हस्ते झाले. सभापती मंगला बोडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, विठ्ठल आवाळे ,मुख्याध्यापिका पुनम गडकर, यशवंत डाळ, शिक्षण संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे, पोपट निगडे ,महेंद्र अप्पा सावंत पंडित गोळे ,वकील शिल्पा काळे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पारितोषिक वितरण भोर पंचायत समितीचे कार्यक्षम  गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शामराव शिंदे यांच्या हस्ते झाले. रेखा मिराशी, सुरेखा बारमुख, कविता देशमाने, डॉक्टर किशोर जगताप व रोहित डामरे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
 विज्ञान प्रदर्शनात पाच गटात एकूण 120 प्रकल्प सादर केले.लहान गट कार्तिक भांडे (सोलर कूलर होम ,संत लिंग नाथ स्वामी विद्यालय भोंगवली)आर्या दिक्षित (ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल) अथर्व गायकवाड .(प्रतिमा न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर) मोठा गट माधुरी सुर्वे( हवेचे प्रदूषण कमी करणारे सिग्नल ,संत लिंग नाथ स्वामी विद्यालय भोंगवली )दीक्षा कंक( स्वयंचलित मानव शोध प्रकाश, इंग्लिश मीडियम स्कूल) अथर्व खोपडे (खत पेरणी यंत्र रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय,नाटंबी)  प्राथमिक शिक्षक गट :सागर खैरमोडे, (गणिती संगणक प्राथमिक शाळा नसरापूर )परशुराम लडकत (ज्ञानरचनावादी साहित्य, प्राथमिक शाळा साळुंगण) माध्यमिक शिक्षक गट: रावसाहेब चौधरी (विज्ञान खेळणी, कानोजी जेधे विद्यालय कारी )संतोष देशमाने (प्रकाशाचे अपवर्तन शिवगंगा माध्यमिक विद्यालय कुसगाव) प्रयोगशाळा सहाय्यक गट :केशव पवळे (पर्यावरणपूरक यंत्र राजा रघुनाथ राव विद्यालय )वकृत्व स्पर्धा लहान गट: अथर्व गायकवाड( न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर) रोशनी कांबळे (सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय खानापूर )वैष्णवी बोडके (प्राथमिक शाळा म्हाळवडी) मोठा गट दिक्षिता कोठावळे( इंग्लिश मीडियम स्कूल ज्ञानदा कंक (गर्ल्स हायस्कूल भोर) अनुष्का शिंदे (राजा रघुनाथ राव विद्यालय )निबंध स्पर्धा लहान गट: गौरी गायकवाड (राजा रघुनाथ राव विद्यालय) प्रणाली सावली (पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे )सुयोग गरुड (जिजामाता प्राथमिक विद्यालय )मोठा गट: शितल दूरकर( राजा रघुनाथ राव विद्यालय) मानसी किंद्रे(जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल) समीक्षा चिकणे (शिवाजी विद्यालय भोर)
To Top