संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करणार : सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे.

Maharashtra varta
भोर( प्रतिनिधी)
खुनाचा प्रयत्नातील 2 गुन्ह्यातील व 1 दरोडा गुन्ह्यातील आरोपीच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींविरुद्ध यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर दाखल असणारे गुन्हे यांचा पूर्वइतिहास पडताळून संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन "राजगड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे" केले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी अशा गंभीर गुन्ह्यातील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. आदित्य तानाजी चौधरी वय 19, संकेत महादेव कुंभार (दोघेही राहणार सासवड तालुका पुरंदर) अनिकेत महादेव काळे वय 19, सागर वसंत काळे( दोघेही राहणार करमाळा सोनोरी तालुका पुरंदर) अभिजीत विजय भिलारे (राहणार भिलारवाडी हातवे बुद्रुक तालुका भोर) व संतोष बाळासाहेब पवार वय 19 (रा. मुकादम वाडी तालुका पुरंदर )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आशिष शेंडकर, उद्धव शेंडकर यांना प्राणघातक हल्ला पुण्यात सासवड पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी दिगंबर शेळके, आदित्य कळमकर सह इतर फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. दिगंबर शेंडकर आणि त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी महेश भैरवनाथ कामटे( वय पंचवीस )यांना दुचाकी बसून आडरानात नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कामठे यांच्याकडील 2000 रोकड घेऊन पलायन केले होते. चांबळी तालुका पुरंदर गावच्या हद्दीत 9 डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. पंधरा दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशन नसरापूरच्या हद्दीत अटक व फरारी आरोपींनी एका नसरापूर येथील शासनमान्य ताडीच्या च्या दुकानावर दरोडा घालून   46 हजारांचा ऐवज चोरून दुचाकीवरून पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल मोरे रामेश्वर धोंडगे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर ,श्रीरंग माळी, हवलदार राजू चंदनशीव, सचिन गायकवाड, जगदीश शिरसाट, रवींद्र शिनगारे अमोल शेडगे ,ज्ञानदेव क्षीरसागर, दत्तात्रय तांबे ,बाळासाहेब फडके, अक्षय नवले आदींनी ही कामगिरी केली आहे.
To Top