अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत भेलके महाविद्यालयाची बाजी

Maharashtra varta



भोर( प्रतिनिधी)विठ्ठल पवार.
भारताचे माजी कृषी मंत्री मा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे वाढदिवसानिम्मित हडपसर गटाअंतर्गत शंकरराव भेलके महाविद्यालयात जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात शिळीमकर प्रसाद, ६१ किलो वजनी गटात धुमाळ मयूर, ७९  किलो वजनी गटात कोंडे सुरज, ८६ किलो वजनी गटात धुमाळ प्रसाद यास द्वितीय तर मुलींच्या कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात सोंडकर श्रद्धा, ६२ किलो वजनी गटात सोनावणे प्रियांका आणि ७६ धुमाळ संयोगिता रवींद्र या भेलके महाविद्यालयातील कुस्तीपट्टूनी यशस्वीरीत्या निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले. वाघिरे महाविद्यालयातील ७४ किलो वजनी गटात जगदाळे प्रतीक, ७९ किलो वजनी गटात खोपडे रोहित द्वितीय ,८६ किलो वजनी गटात जगताप प्रतीक ,९७ किलो वजनी गटात जगताप श्रीनाथ ,१२५ किलो वजनी गटात गायकवाड वैभव यांनी  विजय प्राप्त केला.
या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालय विकास समिती सदस्य मा.शिवनाना कोंडे, प्रा.एस.बी.शिंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नारायण टाक यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाघिरे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आर.सी.कुंभार, तसेच कुस्ती स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून आलेले संघ व्यवस्थापक , पंच व खेळाडू उपस्थित होते.

या प्रसंगी मा.शिवनाना कोंडे यांनी आपल्या मनोगतात खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचा खरा कस लावणारा मातीतला खेळ म्हणजे कुस्ती आहे असे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कुस्ती हा फक्त शारीरिक क्षमतेचा कस लावणारा खेळ नसून यामध्ये बौद्धिक क्षमतेचाही कस लावावा लागतो, विद्यार्थ्यांनी मेहनत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे व महाविद्यालयाचे नाव करावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.पौर्णिमा कारळे यांनी केले.स्पर्धेतील विजयी खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे पंच म्हणून गणेश खोपडे, पांडुरंग लिमन यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कुस्ती स्पर्धेचे निवेदन प्रा.संदीप लांडगे यांनी तर आभार प्रा.व्ही.डी.दसवडकर यांनी मानले.
या कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.पौर्णिमा कारळे, डॉ.एच.एस.सकट, डॉ.टी.बी.घोरपडे,डॉ.आर.जी.सरोदे, डॉ.जे.दि.शेवते, प्रा.एस.जी.रोडे प्रा.भगवान गावित, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.प्रवीण गायकवाड, प्रा.प्रल्हाद ननावरे, प्रा.ए.एस.पावगे, प्रा.आर.आर.पवार, ए.एन.परमार, एस.एम.घोणे, एम.एल.दळवी, गोविंद राठोड, स्वप्नील सरपाले, सुनील कांबळे  यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारायण टाक यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

     
To Top