भोर (प्रतिनिधी):विठ्ठल पवार.
भोर तालुक्याची अग्रगण्य असलेली सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विघ्नहर्ता सहकारी पतसंस्था किकवीची यावर्षीची १५ कोटी रूपयांची उलाढाल व "अ " वर्ग दर्जा पहाता अत्याधुनिक सुविधामुळे खातेदार व सभासदांचे विश्वास केंद्र असलेली विघ्नहर्ता पतसंस्था आहे. राष्ट्रीयकृत बॕकामधून सर्व सामान्य माणसाला कर्ज सहज उपलब्ध होत नाही. सामाजिक बांधलकी जोपासत व बॕकींग क्षेत्र अधिक- अधिक सुलभ करत तळागाळातील लोकांना समजावून घेणारी त्यांना स्थैर्य प्राप्त करून देत पारदर्शक व आदर्श कारभारामुळेच आंबेगाव ता. हवेली पुणे येथे विघ्नहर्ता पतसंस्थेची दुसरी शाखा सुरू केली असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक विशाल तांबे केले.
भोरचे सहाय्यक निबंधक पंढरीनाथ घुगे मनोगतात म्हणाले की, विघ्नहर्ता संस्थेवर ग्राहकांचा अधिकाधिक विश्वास वाढत असून विघ्नहर्ता पतसंस्थेने सुरू केलेली दुसरी शाखा म्हणजे रोपट्याचे वटवृक्ष रूपांतरण होते आहे. विघ्नहर्ता पतसंस्थेचे काम अधीक सहकारभिमुख होत आहे.
विघ्नहर्ता सहकारी पतसंस्था आंबेगाव ,पुणे येथील नुतन शाखेचे गुरूवारी दि.१२ रोजी सांयकाळी ६ वाजता भोरचे सहाय्यक निबंधक पंढरीनाथ घुगे , नगरसेवक विशाल तांबे ,विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतदादा बाठे , माजी सभापती सुनिता बाठे यांच्या हस्ते उदघाटन झाले.या उदघाटन समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक विशाल तांबे बोलत होते.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक विशाल तांबे , नगरसेवक युवराज रेणुसे , पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक विजयराव टापरे ,माजी उपसभापती विक्रम खुटवड ,भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे ,पुणे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे , भोर पंचायत समितीचे उपसभापती श्रीधर किंद्रे , संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ तनपुरे , भोरचे माजी नगरसेवक यशवंत डाळ ,उद्योजक सुनिल धाडवे, गणेश बागल ,अंकुश चव्हाण , संजय मोरे ,यशवंत काळे ,बबनराव बढे , संगिता लेकावळे ,राहूल कापरे , सचिन कदम ,गणपत भंडलकर ,आदी मान्यवर संचालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश तनपुरे यांनी केले तर आभार नारायण भिलारे यांनी मानले.
