भोर(प्रतिनिधी )नवविकास युवक शेतकरी संघटना व सिद्धिविनायक हॉस्पिटल वेळू नसरापुर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी या 26 वर्षीय तरुण डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आले, या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करून तसेच या डॉक्टरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सिद्धिविनायक हॉस्पिटल शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गडावरती स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गडावर येणाऱ्या तरुण तरुणींना यावेळेस काही सामाजिक संदेश देण्यात आले. नुसतेच गडावर फिरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या, आणि आपल्या डोक्यात असणारे हिंसक वृत्ती बाजूला ठेवून एक माणूस म्हणून जगायला शिका. गडावरती येऊन दारू पिऊन व गुटखा तंबाखू खाऊन गड खराब करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजापुढे मांडा .हैदराबाद येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे ,या देशातील मुली एवढ्या सुरक्षित असतील तर समाज म्हणून आपण फारच कमी पडत आहोत. आपण आपल्या मुलींना सुरक्षित वातावरण देऊ शकत नसू तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न फारच गंभीर आहे.
यावेळी सिंहगडा वरती आलेल्या अनेक पालकांना सांगण्यात आले की ,ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श व लढाऊ राजा या राज्याला दिला तसे आपण आपल्या -मुलींना स्वसंरक्षणासाठी लढाऊ बनवा. म्हणजे हैदराबाद सारखे दुर्दैवी घटना घडू शकणार नाही. यावेळी डॉ राजेंद्र डिंबळे व डाॅ सविता डिंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. यावेळी दादासाहेब पवार अध्यक्ष विकास युवक शेतकरी संघटना, डॉक्टर रुपेश जगताप ,श्रेया थिटे कोमल चौधरी, अक्षय घाटे, सानिका बिरनाळे,आणि योगेश नवघणे सहभागी झाले होते
