शैक्षणिक पायवारीत सहभागी व्हा:शिक्षक नेते महेंद्रआप्पा सावंत.

Maharashtra varta
भोर (प्रतिनिधी)विठ्ठल पवार.

सरकारी शाळांच्या समृद्धीसाठी 
सरकारी शाळांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि 
गोरगरीब बहुजन विद्यार्थ्यांचे ज्ञानमंदिर असणाऱ्या सरकारी शाळा बंद करण्याच्या सरकारी धोरणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ,यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिक्षक-पालक व शिक्षण प्रेमी यांची शैक्षणिक पायी वारी स्थळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगांव,ता खंडाळा जिल्हा- सातारा ते भिडेवाडा पुणे या शैक्षणिक पायी वारीमध्ये सर्वांनी सामील व्हा व या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे आवाहन  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचाचे पदाधिकारी व शिक्षक नेते महेंद्र आप्पा सावंत यांनी केले आहे.
नसरापूर ,ता. भोर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.या शैक्षणिक पाय वारीचा दिनक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. 
.03/01/2020  शुक्रवार
      *पहिला दिवस*
🔸सकाळी  7-00  *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले पुतळापूजन     जन्मस्थान*  
🔹सकाळी  7-30  *पायीवारी प्रस्थान        नायगांव*
🔸सकाळी 8-50 वाजता *चहानाष्टा शिरवळ*
🔹दुपारी  12-30 ते 1-30 *धांगवडी येथे जेवण*
🔸दुपारी 1-30 वाजता *पायी वारी कापूरव्होळकडे रवाना .*
🔹संध्याकाळी 6 -00 वाजता *मंगल कार्यालय टोल नाका येथे मुक्कामी* 
🔸रात्री 7-00 ते 8-00 वाजता *जेवण* 
🔹रात्री 8-00 ते 9-00 *विचारमंथन* 
🔸रात्री 9-30 वाजता *विश्रांती*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
04/01/2020 शनिवार
         *दुसरा दिवस*
🔸सकाळी 7-00 वाजता *नाष्टा व चहा* 
🔹सकाळी 7:30 वाजता  *दुसऱ्या दिवसाचे प्रस्थान*  
🔸सकाळी 11:00 वाजता *भिलारेवाडी आर के ग्राउंडवर जेवण* 
🔹सायंकाळी 4:00 वाजता *महात्मा फुले स्मारकाकडे प्रस्थान* 
🔸सायंकाळी 5-00 ते 6:30 वाजता *महात्मा फुले सभागृह कार्यक्रम.*
अश्या प्रकारचा दिनक्रम असणार आहे. त्यासाठी समाजातील सर्व स्तरातील बंधू भगिनी, शिक्षण प्रेमी, नागरिक विद्यार्थी, पालक, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य आणि वारसा अबाधित ठेवू या, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.
To Top