भोर तालुक्यात दिव्यांगांसाठी प्रभावीपणे काम करणारी प्रहार अपंग क्रांती संघटना आहे.गेली वर्षभर अपंगांसाठी ते विशेष उपक्रम राबवत आहे .त्यातीलच एक भाग म्हणजे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी दर मंगळवारी भोर पंचायत समिती, भोर येथे एकत्र येतात. शासनाच्या विविध दिव्यांगांच्या लाभाच्या योजना समजावून घेतात .आपल्या बांधवांना याची माहिती देऊन त्यांचे विहित नमुन्यात अर्ज भरून घेतात . हे प्रभावीपणे काम प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून होत आहे.दिव्यांगासाठी प्रहारचे काम कौतुकास्पद असल्याचे असे मत भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी व्यक्त केले.
अपंग क्रांती संघटना भोर ,यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर आणि पार्क मिंडा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व कृत्रिम अवयव मोजमापन शिबिराचे उदघाटन नसरापूर ता. भोर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल ,नसरापूर येथे भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांच्या हस्ते झाले .त्या वेळेस ते बोलत होते.तर या वेळेस भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे ,सिद्धिविनायक हॉस्पिटल चे चेअरमन डॉक्टर राजेंद्र डिम्बळे,प्रहार अपंग संघटनेचे राज्याध्यक्ष बापूराव कान्हे, पुण्याचे समाजकल्याण विभागाचे अधिकारी श्रीराम सिद्ध वेदपाठक,पार्क मिंडाचे डॉक्टर निलेश पवळे ,डॉ. सुमेध लव्हाळे,भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती लहू नाना शेलार, पत्रकार संजय इंगुळकर ,पत्रकार वैभव धाडवे पाटील,पुणे जिल्हा युवा सेनेचे उपाध्यक्ष आदित्य बोरगे, निवृत्त अधिकारी शामराव कोंडे, भोरचे सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर ,योगेश गाडे,व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळेस शांताराम खाटपे, शामराव कोंडे ,लहू नाना शेलार, डॉ. राजेंद्र डिम्बळे यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थितांचे स्वागत भोर तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब कुडले यांनी केले तर प्रास्ताविक भोरचे सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर यांनी करून कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या दिव्यांग यांची मोफत आरोग्य तपासणी तसेच कृत्रिम अवयव मोजमापन शिबिर संपन्न झाले यात शेकडो दिव्यांगांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजक प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले व महिला अध्यक्ष मनीषा गायकवाड ,विनायक मालुसरे शांताराम खाटपे,भानुदास दुधाने व प्रहारच्या सदस्यांनी केले होते.
अपंगांसाठी असलेला ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी तसेच ग्रामपंचायत उत्पन्नातला पाच टक्के दिव्यांग निधी व 14 वा वित्त आयोग यातील पाच टक्के दिव्यांग निधी हा शंभर टक्के खर्च करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देणार असल्याची माहिती यावेळेस भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.
