भोर (प्रतिनिधी---विठ्ठल पवार)
आमदार बच्चू भाऊ कडू यांचे विचार घराघरांमध्ये मध्ये पोचविणारे पुणे जिल्हा रुग्णसेवक प्रहार ची टीम प्रभावीपणे कार्य करत आहे..रुग्णाच्या हितासाठी व कल्याणासाठी अहोरात्र कार्य करणारा एकमेव प्रहार जनशक्ती पक्ष असल्याचे प्रतिपादन प्रहारचे पुणे जिल्ह्याचे युवा नेते व आदर्श युवा रुग्णसेवक नयन पुजारी यांनी केले.
रुग्ण हा हॉस्पिटल मर्यादित नसतो , तर रुग्णाचा खरा प्रवास त्याच्या घरी गेल्यावर सुरू होतो,.तो हॉस्पिटलमध्ये असताना रुग्णांना स्वयंसेवी सेवाभावी संस्था आणि ,मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत असते.ते मिळवून देण्यास प्रहार रुग्णसेवक टीम प्रयत्न शील राहून काम करत आहेत.
पण काही पेशंट असे असतात की त्यांचे हॉस्पिटलचे उपचार संपले की घरी पाठवण्यात येते..आणि असा पेशंट ला पैसे आणि दुःखाच्या डोंगरा समोर उभे राहावे लागते, या परिस्थितीत सापडलेल्या रुग्णांना नयन पुजारी व प्रहारचे सदस्य यांच्या माध्यमातून काही सेवाभावी ट्रस्ट आणि काही मदत करणाऱ्या संस्था व व्यक्तींना भेटून या रुग्णाला मदत करा असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्ष माध्यमातून करून रुग्णांना दिलासा देत, आहेत.गेल्या 1 वर्षा पासून मदत
आयुबभाई शेख, चॅरिटेबल ट्रस्ट,कोंडवे~धावडे इथे असलेल्या या संस्थेने 90 हजार रुपये आर्थिक मदत घरी असलेल्या व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटना करण्यात आली.आणि ते फक्त गरजू आणि पीडित रुग्णांना.त्यानंतर आता प्रहार ला अजून एक हेलपिंग हँडस म्हणून कार्य सुरू केले ते म्हणजे मंदार गावडे यांनी मदतीचा हात दिला.आणि या रुग्णाच्या समस्येवर मदतीचा तोडगा काढत आहे.
परिवर्तन होणे हाच मुख्य हेतू आहे. रुग्णाला प्रेमाची साथ व मदतीचा हात देणे हाच एकमेव मुख्य उद्देश आहे. यासाठी प्रहारचे रुग्णसेवक असलेले प्रहारचे नयन पुजारी, नौशाद शेख, उमेशभाऊ महाडिक, नितीन पगार, अमोल मानकर,मारुती अप्पा धावडे,संजय गायखे, संतोष साठे, नीरज कडू, कुलदीप मंगळे, संतोष कार्ले, अमोल शेरेकर, आणि संपूर्ण प्रहार टीम यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
