ज्या माणसाच्या मनात व कामात सत्य,पावित्र्य, आणि निःस्वार्थी वृत्ती या तीन गोष्टी असतील तर त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वात कोणत्याही शक्तीत नाही. अखिल विश्व जरी विरोधात उभे राहिले तरी माणूस त्याला सहजपणे तोंड देऊ शकतो, त्यासाठी चांगलं विचार व कामानेच माणूस मोठा होतो असे प्रतिपादन शिक्षक नेते चांगदेवजी थिकोळे यांनी केले.
जिल्हा परिषदेचे नूतन स्थायी समिती सदस्य माननीय दत्ता शेठ झुरुंगे यांच्या 36 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजी शिक्षण मैत्रेय परिवार पुरंदर-हवेली यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगवली ता. भोर येथे संपन्न झाला. त्यावेळेस ते बोलत होते ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी यांनी सुयोग्य पध्दतीने अध्ययन केल्यास यश हमखास मिळते. यावेळेस 500 वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा इंगवली ( ता. भोर ) चे अभ्यासू मुख्याध्यापक माननीय शंकर दलवाई, पुरंदर शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन संदीपआप्पा जगताप, डॉ. चित्रलेखा देसले मॅडम आणि मा. प्रशांत भारती सर.व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..उपस्थितांचे स्वागत डॉ.चित्रलेखा देसले यांनी करून आभार माजी चेअरमन संदीप आप्पा जगताप यांनी मानले. तर प्रभावी सूत्रसंचालन प्रशांत भारती यांनी केले.
शिक्षणमैत्रेय परिवार समाजात एक चांगला काम उभे करत असताना सामाजिक उपक्रम व संकल्पना प्रभावी राबविण्याचे काम आगामी काळात करणार असल्याचे मत शिक्षक नेते व माजी चेअरमन संदीप आप्पा जगताप यांनी व्यक्त केले.
